Maharashtra Corona Update : चिंताजनक! राज्यात 1,134 कोरोनाबाधितांची नोंद, 3 जणांचा मृत्यू

Maharashtra Corona Update : चिंताजनक! राज्यात 1,134 कोरोनाबाधितांची नोंद, 3 जणांचा मृत्यू

Maharashtra Corona Update : चिंताजनक! राज्यात 1,134 कोरोनाबाधितांची नोंद, ३ जणांचा मृत्यू

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे (Maharashtra Corona Update) राज्य सरकारची चिंता वाढवली आहे. कोरोनाबाधितांची संख्या अशीच (Covid-19 cases today) वाढत राहिली तर पुढील 10 दिवसांमध्ये 10 हजार कोरोनाबाधितांची नोंद होईल. राज्यात सध्या 5 हजार 127 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गेल्या 24 तासात 1 हजार 134 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 3 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद (Corona deaths) झाली आहे. वाढत्या कोरोनाच्या संख्येमुळे पुन्हा राज्यात निर्बंध लागू होऊ शकतात.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्ससोबत आढावा बैठक घेतली होती. आगामी 10 दिवस राज्यासाठी फार महत्त्वाचे असतील असा इशारा या बैठकीतून देण्यात आला आहे. 10 दिवसांमध्ये सापडणारे रुग्ण आणि एकूणच परिस्थितीवरुन निर्बंधांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिलासादायक आहे. गेल्या २४ तासात ५६३ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केला आहे. आतापर्यंत 77 लाख 37 हजार 355 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील कोरोनातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.06 टक्क्यांवर आलं आहे.

गेल्या 24 तासात 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 1 लाख 47 हजार 864 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78 लाख 90 हजार 346 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मुंबईतही पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची वाढ होताना दिसत आहे.

मास्क वापरण्याचे आवाहन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढत्या कोरोनाच्या परिस्थितीवर आढावा बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये अद्याप काही निर्णय़ घेण्यात आला नाही. पंरतु निर्बंध नको असतील तर नागरिकांनी कोरोना नियम पाळणं गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी आणि गर्दीच्या ठिकाणी असाल तर मास्क वापरा तसेच नियमांचे काटेकोर पालन केल्यास पुन्हा निर्बध लावण्याची वेळ येणार नाही असा इशारा वजा आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.


हेही वाचा : Priyanka Gandhi Corona Positive: सोनिया गांधींपाठोपाठ आता काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींना कोरोनाची लागण

First Published on: June 3, 2022 6:50 PM
Exit mobile version