Priyanka Gandhi Corona Positive: सोनिया गांधींपाठोपाठ आता काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींना कोरोनाची लागण

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांना काल(गुरूवार) कोरोनाची लागण (Covid-19) झाली होती. मात्र, त्यांच्यानंतर आता त्यांची मुलगी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत प्रियंका गांधी यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्या लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

कोरोनाची लक्षणं सौम्य असून माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वत:ला घरीच क्वारंटाईन केलं आहे. माझ्या संपर्कामध्ये आलेल्या लोकांनी सर्व आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि चाचणी करावी, असं आवाहन प्रियंका गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत:ला आयसोलेट करून घेतले आहे. मात्र, सोनिया गांधी ८ जूनच्या आधी ठीक होतील, अशी माहिती सुरजेवाला यांनी दिली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स पाठवले असून चौकशीसाठी ८ जून रोजी कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले होते.

मात्र, सोनिया गांधींना आता कोरोनाची लागण झाले आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी हे परदेशी दौऱ्यावर असून ते १० जूनला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ईडीने त्यांना १३ जूनपर्यंत पुन्हा एकदा हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. त्यामुळे राहुल गांधी हे ईडी कार्यालयात दाखल राहणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.


हेही वाचा : National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींना ईडीचे समन्स, ८ जूनला चौकशीला हजर राहण्याचे आदेश