जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर कंपनीवर एफडीएची मोठी कारवाई, उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द

जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर कंपनीवर एफडीएची मोठी कारवाई, उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द

जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर या कंपनीवर एफडीएने मोठी कारवाई केली आहे. एफडीएने कंपनीचा उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे. जॉन्सन अँड जॉन्सन या प्रसिद्ध कंपनीने उत्पादन केलेल्या ‘जॉन्सन बेबी पावडर’ या सौंदर्य प्रसाधनांचे नमुने प्रशासनाच्या नाशिक आणि पुणे येथील अन्न आणि औषध निरीक्षकांनी गुणवत्ता चाचणीसाठी घेतले होते. परंतु या पावडरच्या वापराने नवजात बालकाच्या त्वचेस हानी पोहोचत असल्याने कंपनीच्या उत्पादनाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे.

नवजात बालकांसाठी जॉन्सन अॅंड जॉन्सन बेबी पावडरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परंतु या कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेत दोष असल्यामुळं नवजात शिशू आणि लहान मुलांच्या त्वचेस अपाय होण्याची शक्यता आहे. कंपनीचे उत्पादन अशाच प्रकारे सुरू राहिल्यास बालकांच्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे मुंबई आणि मुलुंडमध्ये असणाऱ्या संस्थेच्या उत्पादनाचा परवाना आजच्या आदेशान्वये कायम स्वरूपी रद्द करण्यात आला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून जॉन्सन अॅंड जॉन्सन कंपनी भारतात आपल्या उत्पादनांची विक्री करत आहे. परंतु सदर नमुने सदोष आहेत. त्यामुळेच या कंपनीच्या उत्पादनचा परवाना रद्द करण्यात येत आहे असं सरकारच्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. या उत्पादनातील PH हा प्रमाणित मानकांनुसार नाही. ही पावडर वापरल्याने नवजात तसंच लहान मुलांच्या त्वचेला अपाय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावडरचे उत्पादन सुरू ठेवणं हे योग्य होणार नाही, असं अन्न आणि औषध प्रशासनाने म्हटलं आहे.


हेही वाचा : दसऱ्याला शिवाजी पार्क सुने-सुने; कायदा सुव्यवस्थेमुळे दोन्ही गटांना परवानगी नाकारण्याची शक्यता


 

First Published on: September 16, 2022 11:08 PM
Exit mobile version