11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर

अकरावी प्रवेशाची (Maharashtra FYJC Merit List) पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. या पहिल्या गुणवत्ता यादीत 1 लाख 39 हजार 651 म्हणजेच 58.86 टक्के विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले आहे. (maharashtra fyjc merit list 2022 cut off list of popular college)

पहिल्या गुणवत्ता यादीत 61,635 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले आहे. तर 21 हजार 690 विद्यार्थ्यांना दुसरा पसंतीचे कॉलेज मिळाले आहे. तसेच, 14,476 विद्यार्थ्यांना तिसरा पसंतीचे कॉलेज मिळाले आहे.

यंदा मुंबईतील नामांकित कॉलेजचा कट ऑफ 90 पार असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, शाखेनुसार विज्ञान (Science) शाखेत प्रवेश घेणाऱ्या 48 हजार 456 विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत कॉलेज मिळाले आहे.

वाणिज्य (Commerce) शाखेत प्रवेश घेणाऱ्या 75 हजार 357 विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत कॉलेज मिळाले आहे. कला (Arts) शाखेत प्रवेश घेणाऱ्या 14 हजार 831 विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत कॉलेज मिळाले आहे.

पहिल्या गुणवत्ता यादीत कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांना आपले कॉलेज निश्चित करण्यासाठी 6 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 2.45 लाख विद्यार्थ्यांनी सामाईक प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत 2 लाख 30 हजार 927 जागांवर प्रवेश घेण्यासाठी अर्ज केले आहेत. 17 जुलै 2022 रोजी जाहीर झालेल्या महाराष्ट्र SSC निकालात 95 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत खूपच जास्त होती.

नामांकित कॉलेज कट-ऑफ


हेही वाचा – मोठी बातमी! नवी वॉर्ड रचना रद्द, २०१७ च्या प्रभाग रचनेप्रमाणेच महापालिका निवडणुका होणार

First Published on: August 3, 2022 7:09 PM
Exit mobile version