एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत, कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारने दिले १३० कोटी

एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत, कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारने दिले १३० कोटी

गावखेड्यापासून सेवा देणारी लालपरी अर्थात एसटी मागील अनेक वर्षे आर्थिक तोटा सहन करते. याचा झळा आता कर्मचाऱ्यांनाही बसू लागल्या आहे. एसटी महामंडळामधील एक लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न ऐरणीवर आला असून राज्य सरकारकडून वेतनासाठी १३० कोटी रुपये अंतिम निधी मिळाला आहे. यातून कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचा पगार देण्यात येणार आहे. मात्र त्यानंतर एसटी महामंडळाकडे पगारासाठी एकही रुपये शिल्लक राहणार नसल्याने मे महिन्याचे आणि त्यानंतरचा महिन्याचे वेतन द्यायचे कसे असे मोठे संकट महामंडळसमोर आहे. दरम्यान कोरोनामुळे गेल्या एक वर्षापासून एसटी महामंडळाचा कर्मचाऱ्यांसमोर पगार नसल्याने मोठे आर्थिक संकट सहन करावे लागले. आधीच कमी पगार त्यात आता मे महिन्यापासून पगार मिळणार की नाही याचीही शाश्वती नसल्याने कर्मचाऱ्यांवर बिनपगारी काम करण्याची वेळ ओढावली आहे. तर काही कर्मचाऱ्यांनी पगार नसल्याने आत्महत्याही केल्याचा घटना समोर आल्या होत्या.

गेल्यावर्षी देशभरात कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला यामुळे एसटी महामंडळाला मोठ्या आर्थिक तोट्यातून जावे लागले. त्यावेळी राज्य सरकारने नोव्हेंबर २०२० ते मार्च २०२१ या महिन्यांत एसटी महामंडळाचा कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी १ हजार कोटी रुपयांचे पॅकेड जाहीर केले. या पॅकेजमधील १२० कोटी रुपये राज्य सरकारने महामंडळाला कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर २०२० महिन्याचे पगार देण्यासाठी दिले. परंतु राज्य सरकारच्या पॅकेजमधील ८८० कोटी रुपये शिल्लक होते. मात्र ही उर्वरित रक्कम महामंडळाने कर्मचाऱ्यांचा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा पगार देण्यासाठी वापरली. त्यामुळे महामंडळाकडे स्वत:ची काहीच शिल्लक रक्कम नाही.

यावर गृह विभागाचा डेस्क ऑफिसर मेघना शिंदे यांनी जारी केलेल्या सरकारी अधिसूचनेनुसार, एसटी महामंडळ कर्मचाऱ्य़ांना एप्रिल महिन्याचा पगार देण्यासाठी सरकारने १३० कोटी रुपये जाहीर केले आहेत. परंतु यानंतर मे आणि त्य़ानंतरचा महिन्यांचा पगार द्याचा कसा असा मोठा प्रश्न एसटी महामंडळासमोर उभा राहिला आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षभरात एसटी महामंडळाला दर महिना ५० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. तर यंदाही कोरोनाचा दुसऱ्या लाटेदरम्यान महामंडळ दर दिवसा २२ कोटींचा तोटा सहन करतोय. दरम्यान कोरोना दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांची वाढती संख्या आणि यात तिसऱ्या लाटेचा धोका पाहता एसटी महामंडळ प्रवासी संख्या रोडावली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे.


 

First Published on: May 7, 2021 10:49 AM
Exit mobile version