अनियंत्रित लोकशाही हुकूमशाहीला जन्म देते, मल्लिकार्जुन खरगे यांचा भाजपवर निशाणा

अनियंत्रित लोकशाही हुकूमशाहीला जन्म देते, मल्लिकार्जुन खरगे यांचा भाजपवर निशाणा

अनियंत्रित लोकशाही हुकूमशाहीला जन्म देते हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शब्द आज खरे ठरत आहेत, अशा शब्दात राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिवसरात्र एक करून देशाला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान दिले. परंतु आज लोकशाही आणि संविधान धोक्यात आले आहे. विद्यमान सत्ताधा-यांकडून लोकशाही, संविधानाला पायदळी तुडवून राज्यकारभार सुरु आहे, असा आरोपही खरगे यांनी लगावला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि मुंबई विभागीय काँग्रेसच्यावतीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी व्हर्च्युअल सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना खरगे यांनी भाजपवर तोफ डागली. गेल्या काही वर्षात दलित, अल्पसंख्याकांवर अत्याचार वाढले आहेत. प्रसार माध्यमांनाही बोलण्याची मोकळीक नाही. सीबीआय, ईडी, निवडणूक आयोग अशा सर्व स्वायत्त संस्थांचा दुरुपयोग वाढला आहे. सरकारच्या विरोधात बोलले की चौकशी लावली जाते. आंदोलन केले तर बदनाम केले जाते. भाजपा-आरएसएस हे समाजात विद्वेषाचे बिज पेरून धर्माच्या, जातीच्या नावावर फूट पाडण्याचे काम करत आहेत, अशी कडवट टीका खरगे यांनी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक धोरण हे देशातील शोषित, वंचित, पददलित समाजाला न्याय देणारे होते. परंतु दुर्दैवाने आज केंद्रातील सरकार हे देशातील मूठभर लोकांसाठीच आर्थिक धोरणे राबवत आहे. फुले, शाहु, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसाच देशाला तारणारा असून हा विचार राज्यात यापुढेही रुजवू आणि देशाला तोडू पाहणारा विचार नष्ट करणे.

First Published on: April 14, 2021 9:23 PM
Exit mobile version