Maharashtra Lockdown: आंदोलनानंतर सोलापूरमधील व्यापारी-नागरिकांना दिलासा; महापालिका क्षेत्रातील निर्बंध शिथिल

Maharashtra Lockdown: आंदोलनानंतर सोलापूरमधील व्यापारी-नागरिकांना दिलासा; महापालिका क्षेत्रातील निर्बंध शिथिल

Maharashtra Lockdown: आंदोलनानंतर सोलापूरमधील व्यापारी-नागरिकांना दिलासा; महापालिका क्षेत्रातील निर्बंध शिथिल

राज्यातील अनलॉक आणि लॉकडाऊनबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यापूर्वी १ जूनपासून राज्यातील पॉझिटिव्हीटी दर कमी असणाऱ्या जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यात आले आणि पॉझिटिव्हीटी दर जास्त असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध कायम ठेवले किंवा वाढवण्यात आले. याप्रमाणे ग्रामीण भागातील वाढवत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोलापूर जिल्ह्यात सुद्धा निर्बंध कायम ठेवण्यात आले. पण या विरोधात विडी कामगार, दुकान आणि व्यापाऱ्यांनी आंदोलन केले. या आंदोलन यश आले असून सोलापूर महापालिका क्षेत्रातील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोलापूरमधील व्यापारी आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

माहितीनुसार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने महानगरपालिका क्षेत्रात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यासाठी मान्यता दिली आहे. यानुसार महानगर पालिका क्षेत्रात अत्यावश्यक दुकानांची वेळ सकाळी ७ ते ११ होती ती आता वाढवून सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक नसलेली दुकाने ही पूर्णवेळासाठी बंद होती पण आता ही दुकाने सुद्धा सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र सोमवार ते शुक्रवार यादरम्यान सुरू राहतील, शनिवार आणि रविवारी पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील. शिवाय यंत्रणा, विडी आणि गारमेंट उद्योगसुद्धा सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. संपूर्ण सोलापूरात दुपारी ३ नंतर कडक संचारबंदी लागू होईल. अनावश्यक कारणाशिवाय नागरिकांना कुठेही बाहेर फिरता येणार नाही.


हेही वाचा – काय सुरु, काय बंद? कुठे केव्हापर्यंत, अनलाॉकच्या संभ्रमावरुन फडणवीस यांची प्रश्नांची सरबत्ती


First Published on: June 4, 2021 8:42 AM
Exit mobile version