…आणि संजय राठोडांच्या पत्नीला आली भोवळ

…आणि संजय राठोडांच्या पत्नीला आली भोवळ

...आणि संजय राठोडांच्या पत्नीला आली भोवळ

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड सपत्नीक आज पोहरादेवी गडावर गेले . मात्र समर्थकांनी केलेल्या अलोट गर्दीमुळे राठोड व त्यांच्या पत्नी शीतल यांना गर्दीतून वाट काढणेही कठीण झाले. यावेळी
तोंडावर मास्क व गर्दीमुळे शीतल यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांना भोवळ आली. राठोड आज पोहरादेवीच्या दर्शनासाठी गडावर येणार असल्याने त्यांच्या समर्थकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. पोलिसांनी ५० जणांनाच गडावर उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती. पण सर्व नियम धाब्यावर बसवून समर्थकांनी गडावर गर्दी केली. यावेळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. याच गर्दीचा त्रास राठोड यांच्या पत्नीला झाला.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी नेते संजय राठोड हे आज तब्बल १५ दिवसांनी जनतेच्या समोर आले आहेत. संजय राठोड आज सकाळी १०: १५ वाजताच्या सुमारास यवतमाळ येथील त्यांच्या निवासस्थानातूव पोहरादेवी मंदिराकडे रवाना झाले. दुपारी १२: ४० वाजता संजय राठोड वाशिम येथील पोहरादेवी येथे पोहचले. गेल्या १५ दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन रंगल्या. मात्र संजय राठोड यांच्या पत्नी शीतल चव्हाण या सर्व प्रकरणात त्याच्यासोबत होत्या.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी असे म्हटले की, पूजा चव्हाणचा मृत्यू हा दुर्दैवी होता. तिच्या आत्महत्येवरुन जे घानेरडे राजकारण केले जात आहे ते अतिशय चुकीचे आणि निराधार आहे. गेली ३० वर्षे मी मागासवर्गीय,विमुक्त भटक्या कुटुंबातून ओबीसीचे नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे. माझ्या सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक आयुष्य उद्धवस्त करण्याचा वाईट प्रकार आपण सगळ्यांनी पाहिला आहे, असे ते म्हणाले.


हेही वाचा – पूजा चव्हाण आत्महत्या; सत्तेच्या बळावर प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न – प्रवीण दरेकर

First Published on: February 23, 2021 2:46 PM
Exit mobile version