कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबाबतची घोषणा करावी; सुभाष देसाईंची केंद्राकडे मागणी

कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबाबतची घोषणा करावी; सुभाष देसाईंची केंद्राकडे मागणी

कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी केंद्राने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याची घोषणा करावी; सुभाष देसाई यांची मागणी

मराठी भाषेला तात्काळ अभिजात दर्जा मिळावा या मागणीसाठी महाराष्ट्राचे शिष्ठमंडळ आज दिल्लीमध्ये दाखल झाल आहे. यावेळी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किसान रेड्डी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राचे पथक राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आणखी 4 हजार पत्र पाठवणार आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी मान्यवरांनी या पत्रांवर स्वाक्षरी केली आहे. दरम्यान आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किसान रेड्डी यांच्या भेटीत मंत्री सुभाष देसाई यांनी विनंती केली की, महाराष्ट्रात 27 फेब्रुवारी हा दिवस कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या शुभ मूहुर्तावर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याची घोषणा करावी.

मंत्री सुभाष देसाई या भेटीसंदर्भातील माहिती देताना म्हणाले की, “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही महाराष्ट्राची मागणी आहे. या मागणी संसदेमध्ये जे उत्तर दिले ते अतिशय सकारात्मक होते. मराठी भाषेने अभिजात भाषेसाठी असलेले सर्व निकष पूर्ण केले आहेत. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची घोषणा लवकरात लवकर करू असे विधान महाराष्ट्राच्या खासदारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय मंत्रालयाने स्पष्ट केले. त्यामुळे महाराष्ट्रात एक चांगला संदेश गेला.”

“त्यानंतर आम्ही ठरवले केंद्र सरकार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारचं आहे तर त्यासाठी आणखी एक प्रयत्न करावा आणि जो लवकरात लवकर मिळावा ती पूर्तता व्हावी. येत्या 27 फेब्रुवारीला हा दिवस आपण महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो, दरवर्षी या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात, सोहळे होतात, साहित्यिकांना, प्रकाशकांना पुरस्कार दिले जातात, तो कार्यक्रम याही वर्षी मुंबईत होणार आहेत. महाराष्ट्रात कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या शुभ मूहुर्तावर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याची घोषणा करावी ही विनंती घेऊन आज मंत्र्यांची भेट घेतली. त्यांना संपूर्ण माहिती दिल्यानंतर त्यांनी सांगितले की, ही सर्व माहिती आमच्या पर्यंत आलेलीच आहे. सर्व अभ्यास केल्यानंतर केंद्र मराठी भाषा सर्व निकष पूर्ण करते 99 नाही तर 100 टक्के त्यांना ते मान्य आहे,” असही मंत्री सुभाष देसाई  म्हणाले.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त केंद्रीय मंत्र्यांनी मुंबईत येण्याचे आमंत्रण 

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हेदेखील याबाबत सकारात्मक आहेत. त्यामुळे काही अडचण राहिलेली नाही. यावेळी सांस्कृतिक मंत्र्यांना येत्या 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुंबईत येण्याचे आमंत्रण दिले आहे. तसेच याचदिवशी महाराष्ट्रातूनचं याची घोषणा करा, ज्यातून आम्हाला केंद्र सरकारचे आभार मानण्याची संधी मिळेल”, अशी विनंती केल्याचेही माहिती मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.


 

First Published on: February 21, 2022 3:18 PM
Exit mobile version