पावसाळी अधिवेशानासाठी नवा मुहूर्त; 17 ऑगस्टपासून विधिमंडळ अधिवेशन

पावसाळी अधिवेशानासाठी नवा मुहूर्त; 17 ऑगस्टपासून विधिमंडळ अधिवेशन

संग्रहित छायाचित्र

मुंबई : राज्यात मोठ्या सत्तांतरणानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाने नवे सरकार स्थापन झाले. या नव्या सरकारचे विधीमंडळाचे पहिले पावसाळी अधिवेशन 10 ऑगस्टपासून सुरु होणार होते. मात्र राज्य मंत्रिमंडळाच्या रखललेल्या विस्तारामुळे हे पावसाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलण्यात आले आहे. ज्यानंतर अधिवेशनासाठी नवा मुहूर्त शोधण्यात आला आहे. त्यानुसार येत्या 17 ते 23 ऑगस्टपर्यंत विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे. याबाबत मंगळवारी आज विधान भवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. ज्यात अधिवेशनाच्या तारखांवर शिक्कामोर्तब केला जाईल.

हेही वाचा : सरकार स्थापनेच्या 39 व्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार; राजभवनात होणार शपथविधी

एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार राजभवनात आज सकाळी 11 वाजता होणार आहे. यानंतर दुपारी सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर विधान भवनात अधिवेशनाच्या कामकाज निश्तित करण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित केले आहे.

दरम्यान मंगळवारी म्हणजे सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या विस्तारानंतर प्रत्येक मंत्र्याला आपल्या पदाचे कामकाज जाणून घेण्यासाठी चार दिवसांचा कालावधी गरजेचा असतो. त्यामुळे अधिवेशनाच्या तारीख पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात आहे. यानुसार राज्याचे विधीमंडळाचे आगामी अधिवेशन 17 ऑगस्ट ते 26 ऑगस्टपर्यंत होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : हिंगोलीतील ‘कावड यात्रे’त मुख्यमंत्री शिंदे यांचा सहभाग, ‘भगवान शंकरा’चा जयघोष

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानमंडळ सचिवालयाने मोहरमच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही आपले कार्यालय सुरु ठेवले आहे. तसेच 9 ते 18 ऑगस्ट या कालावधीत रजेवर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

दरम्यान यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी पावसाळी अधिवेशन 18 जुलै रोजी होईल असे घोषित केले होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आले.

मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय इतर मंत्र्यांचा शपथ विधीचं अद्याप झालेला नाही, त्यामुळे महिना उलटून गेला तरी सरकारला मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या या विस्तारावरून आता विरोधकांकडूनही जोरदार टीका होत आहे. यात आज होणाऱ्या मंत्रिमंडळात विस्तारात नेमकं कोणतं मंत्रिपद कोणाला मिळणार? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागलून आहे.


राज्यात पावसाची दमदार बॅडिंग; कोकणासह मुंबईत वादळी वाऱ्यासह संततधार

First Published on: August 9, 2022 8:56 AM
Exit mobile version