घरताज्या घडामोडीसरकार स्थापनेच्या 39 व्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार; राजभवनात होणार शपथविधी

सरकार स्थापनेच्या 39 व्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार; राजभवनात होणार शपथविधी

Subscribe

राज्यातील नव्या शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. मागील 38 दिवस रखडलेला विस्तार मंगळवारी सकाळी 11 ला राजभवनवर होणार आहे. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देणार आहेत. या मंत्रिमडळासाठी शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी 9 - 9 आमदार शपथ घेतील असे सांगितले जात आहे.

राज्यातील नव्या शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. मागील 38 दिवस रखडलेला विस्तार मंगळवारी सकाळी 11 ला राजभवनवर होणार आहे. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देणार आहेत. या मंत्रिमडळासाठी शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी 9 – 9 आमदार शपथ घेतील असे सांगितले जात आहे. दरम्यान, राज्यात सरकार स्थापन होऊन महिना उलटला तरी, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता. त्यामुळे विरोधी पक्षांकडून शिंदे सरकारवर टीका केली जात होती. परंतु, आज अखेर मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त ठरला आहे. त्यामुळे कोणत्या आमदारांना शपथ दिली जाते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Swearing at the Raj Bhavan Durbar Hall Maharashtra Cabinet Extension )

आजच्या शपथविधी सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. नव्या शिंदे गट आणि भाजपा यांच्या सराकारच्या मंत्रिमंडळात भाजपाकडून नवे चेहरे दिले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, अनुभवी नेत्यांनाच पुन्हा संधी देत भाजपाने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

- Advertisement -

मंत्रिमंडळातील महत्वाची खाती ही भाजपाकडे जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार, सामान्य प्रशासन, नगर विकास, उद्योग, कृषी ही खाती मुख्यमंत्री शिंदे गटाकडे तर गृह, वित्त, महसूल, सार्वजनिक बांधकाम ही खाती भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर संध्याकाळी खातेवाटप जाहीर केले जाणार आहे. गृह आणि वित्त ही खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहतील, असेही बोलले जात आहे.

शालेय शिक्षण, ग्रामविकास, आदिवासी विकास हे भाजपकडे जाऊ शकते. तसेच, उच्च शिक्षण, जलसंपदा शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. शिवाय महसूलही भाजपकडे जाण्याची शक्याता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

भाजपाकडून या आमदारांनी संधी दिली जाण्याची शक्यता

  • प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
  • माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार
  • राधाकृष्ण विखे पाटील
  • गिरीश महाजन
  • माधुरी मिसाळ
  • संभाजी पाटील निलंगेकर
  • सुरेश खाडे
  • मंगल प्रभात लोढा
  • विजयकुमार गावित
  • रवींद्र चव्हाण

मुख्यमंत्री शिंदे गटाकडून या आमदारांनी संधी दिली जाण्याची शक्यता

  • उदय सामंत
  • दीपक केसरकर
  • दादा भुसे
  • संजय राठोड
  • संजय शिरसाट
  • तानाजी सावंत
  • संदिपान भुमरे
  • शंभुराज देसाई

आजच्या मंत्रिमंडळासाठी भाजपा आणि शिंदे गटाकडून अद्याप कोणत्याही आमदाराचे नाव अधिकृतपणे जाहीर करण्यात आले नाही. आज रात्री किंवा बुधवारी सकाळपर्यंत नावे निश्चित होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कोणत्या आमदाराला कोणती खाती दिली जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – कसला न्याय आणि कसला अन्याय? शिवसेनेचे शिंदे सरकारवर जोरदार टीकास्त्र

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -