अनोखा विवाह सोहळा: लेकीच्या लग्नात पित्यानं वऱ्हाडींना वाटली वडाची झाडं अन् बियाणे

अनोखा विवाह सोहळा: लेकीच्या लग्नात पित्यानं वऱ्हाडींना वाटली वडाची झाडं अन् बियाणे

Maharashtra Nashik news farmer distributed trees and seeds to the bridegroom in his daughters wedding

अनेकजण आपलं लग्न इतरांपेक्षा वेगळं करण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित करत असतात. काहीतरी हटके आयडिया करुन आपला विवाह सोहळा लोकांच्या स्मरणात राहावा, यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. अनेकदा त्याचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होतात. मात्र, जळगावातील एका बियाणे विक्रेत्याने आपल्या लेकीच्या लग्नात उपस्थितांना वडाचं रोपटं आणि शेतकऱ्यांना बियाण्याचे वाटप अनोखा आदर्श घालून दिला आहे. ( Maharashtra Nashik news farmer distributed trees and seeds to the bridegroom in his daughters wedding  )

जळगावातील प्रसिद्ध बियाणे विक्रेते विनोद तराळ यांची कन्या ऐश्वर्या हिचा रोशन देवकर यांच्यासोबत मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे पार पडला. लाडक्या लेकीचा विवाह सोहळा थाटात व्हावा, अशी प्रत्येक पित्याची इच्छा असते. मात्र, लेकीच्या लग्नात जास्तीचा खर्च न करता पैसे वाचवून त्या बदल्यात शेतकऱ्यांसाठी अनोखा उपक्रम विनोद तराळ यांनी राबवला आहे. मुबलक स्वरुपात पाऊस पडावा म्हणून झाडाचं महत्त्व तर आहेच, पण त्याचबरोबर वडाच्या झाडाचे मोठे महत्व आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने शेतात वडाचं रोपटं लावा यासाठी चक्क लग्न मंडपात वधू आणि वराच्या हस्ते शेतकऱ्यांना वडाचे रोपटं भेट म्हणून देण्यात आलं.

या रोपट्याबरोबरच तुरीच्या बियाण्याचं शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलं. या विवाह सोहळ्यात एकीकडे अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला ही विनोद तराळ आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या आनंदात सहभागी करुन घेतले. केवळ आनंदातच सहभागी करुन घेतले नाही तर शेतकऱ्यांना कायम स्मरणार राहिलं, अशी वडाचं रोपट्याची भेट देण्यात आली. लग्न सोहळ्यातील या उपक्रमामुळे शेतकरी चांगलेच भारावल्याचं पाहायला मिळालं. याचा मोठा आनंद व्यक्त करत शेतकऱ्यांनी विनोद तराळ आणि त्यांच्या कुटुंबातं कौतुकसुद्धा केलं.

( हेही वाचा: हेल्मेटसक्तीला विरोध करणाऱ्या पुण्यात आज लाक्षणिक हेल्मेट दिवस )

शेतकऱ्यांसाठी जो उपक्रम लग्न सोहळ्यात राबवण्यात आला त्यामुळे नक्कीच आमचा विवाह सोहळा हा अविस्मरणीय ठरला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. या अनोख्या विवाह सोहळ्याची जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली आहे. तर वधू आणि वर यांच्यासाठीसुद्धा हा विवाह सोहळा अविस्मरणीय ठरला असल्याचं वराने सांगितलं आहे.
First Published on: May 24, 2023 10:08 AM
Exit mobile version