Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी हेल्मेटसक्तीला विरोध करणाऱ्या पुण्यात आज लाक्षणिक हेल्मेट दिवस

हेल्मेटसक्तीला विरोध करणाऱ्या पुण्यात आज लाक्षणिक हेल्मेट दिवस

Subscribe

पुण्यात आज हेल्मेट वापराच्या जनजागृतीसाठी लाक्षणिक हेल्मेट दिवस साजरा करण्यात येणार आहे. रस्त्यावर जागोजागी उभे राहून दुचाकीस्वारांना चौकात अडवून वाहतूक पोलीस हेल्मेटसक्तीची कारवाई करत असत. परंतु त्याला पुण्यात विरोध झाल्यामुळे चौकातील कारवाई बंद करण्यात आली. आता फक्त सीसीटीव्हीद्वारे सध्या हेल्मेट सक्तीची कारवाई केली जात आहे.

या दिवशी दुचाकीस्वार सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचारी हे कार्यालयात येताना आणि कार्यालयातून घरी परत जाताना हेल्मेट परिधान करणार आहेत. शहरातील सर्व प्रमुख शासकीय कार्यालयाबाहेर हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांची जनजागृती करण्याबरोबरच कारवाई करण्यात येणार आहे.

- Advertisement -

रस्त्यावरील वाढत्या अपघातात दुचाकीस्वारांचा सर्वाधिक समावेश असल्याने जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हेल्मेट वापराबाबत व्यापक जनजागृतीसाठी २४ मे रोजी लाक्षणिक हेल्मेट दिवस साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे या दिवशी सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.

राज्यासह देशात जवळपास ४११ नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. वाहन अपघातात मृत्यू होणाऱ्या व्यक्तींमध्ये सुमारे ८० टक्के व्यक्ती या दुचाकीचालक, पादचारी आणि सायकलस्वार असतात. हेल्मेटमुळे दुचाकीचा अपघात घडल्यास जीव वाचण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे मोटार वाहन कायद्यानुसार चार वर्षांपुढील प्रत्येक व्यक्तीने दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट परिधान करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी म्हटले आहे.


- Advertisement -

हेही वाचा : मुंबईत अजून एका रेल्वे टर्मिनसची भर, ‘या’ स्थानकावरही एक्स्प्रेसला मिळणार रेड


 

- Advertisment -