मोठी बातमी : उद्धव ठाकरेंपासून मला तोडण्याचा प्रयत्न, संजय राऊत असं का म्हणाले?

मोठी बातमी : उद्धव ठाकरेंपासून मला तोडण्याचा प्रयत्न, संजय राऊत असं का म्हणाले?

हे सरकार बेकायदेशीर आहे, त्यांचा आदेश पाळू नका, असं आवाहन ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत केलं होतं. त्यामुळे नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात कलम 505 अतंर्गत संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर आता संजय राऊत यांनी भाष्य करत सरकारवर गंभीर आरोप केला आहे. ( Maharashtra Politics Sanjay Raut alleged that Shinde Fadnavis government trying me to detached from Thackeray gruop leader Uddhav Thackeray )

या सरकारला माझ्यावर दबाव आणायचा आहे. मला शरण यायला भाग पाडाय़चं आहे. हे सरकार मला शिवसेना (ठाकरे गट), उद्धव ठाकरे यांना सोडायला भाग पाडत आहे, अशा प्रकारची दबावनीती आहे परंतु मी दबावाला बळी पडणार नसल्याचं राऊत यांनी यावेळी सांगितलं.

सामान्य माणासाच्या मनातल्या आणि कायद्याच्या चौकटीतल्या भावना मी व्यक्त केल्या. सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला. त्यात त्यांनी अनेक बाबींवर सरकारवर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे हे स्पष्ट आहे ती या सरकारवर अजूनही अपात्रतेची टांगती तलवार आहे. या सरकारचा व्हीप, गटनेता बेकायदेशीर आहे. त्यामुळे हे सरकार बेकायदेशीर आहे, त्यांचे आदेश पाळणारे बेकायदेशीर ठरतील, त्यामुळे अशा सरकारच्या आदेशांचं पालन केल्यानं त्या अधिकाऱ्यांना भविष्यात चौकशीला सामोरं जावं लागेल ही भूमिका मी मांडली त्यात चिथावणी आणि तणाव निर्माण करण्याची भाषा कुठून आली? असं म्हणत राऊतांनी स्पष्टीकरण देत सारवासारव केली आहे. नाशिकमध्ये माझ्यावर गुन्हा दाखल झाला असला, तर मी त्या कारवाईला सामोरा जाईन, असं राऊत म्हणाले.

( हेही वाचा: ‘यांचे अस्तित्व मोदींमुळे, ही सर्व छोटी माणसं’, राज ठाकरेंचा फडणवीसांना टोला )

विधानसभा अध्यक्ष यांना आज शिवसेना भेटणार 

ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा विषय ताशेरे मारून हे कसं बेकायदेशीर आहे यासंदर्भातल्या सविस्तर खुलासा करून ते सर्व प्रकरण विधानसभा अध्यक्ष आणि सोडवावा आणि निर्णय घ्यावा शिवसेनेचे आमचे प्रमुख लोक आज विधिमंडळात जाऊन त्या संदर्भात सविस्तर अपील, तक्रार दाखल करणार आहेत, अशी माहिती राऊत यांनी दिली.

राऊतांनी विधानसभा अध्यत्रांना टोला लगावत म्हटलं की,  काल मर्यादा हा शब्द ठीक आहे विधानसभेचे अध्यक्ष वापरत आहेत वेळेची मर्यादा नाही प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे सरकारला सुद्धा एक्सपायरी डेट असते औषधाला असते प्रत्येकाला आहे त्याच्यामुळे आम्हाला कायदा आम्हालाही  कळतो, असं राऊत यावेळी म्हणाले.

First Published on: May 15, 2023 10:49 AM
Exit mobile version