एकनाथ शिंदे यांच्या मनात उठावाचे बीज मीच पेरले; विजय शिवतारे यांचा मोठा गौप्यस्फोट

एकनाथ शिंदे यांच्या मनात उठावाचे बीज मीच पेरले; विजय शिवतारे यांचा मोठा गौप्यस्फोट

विजय शिवतारेंना लिहिलेल्या पत्रास शिवसैनिकाचे सडेतोड प्रत्युत्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेत उभी फुट पडली. शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत दोन गट निर्माण झाले. विशेष म्हणजे या बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी वारंवार आम्ही उठाव केला असल्याचे सांगितले. त्यानंतर बंडासंदर्भात अनेक खुलासे झाले. दरम्यान, शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी यावर पहिल्यांदाच खुलासा केला आहे. त्यानुसार, “एकनाथ शिंदे यांच्या मनात उठावाचे बीज मीच पेरले होते. महाविकास आघाडी सरकार आम्हाला मान्य नव्हते”, असाही गौप्यस्फोट त्यांनी केला. (Maharashtra Politics Vijay Shivtare Eknath Shinde Maha Vikas Aghadi Shivsena)

एका वृत्तवाहिनीशी बोलताना विजय शिवतारे यांनी सांगितले की, “राज्यातील महाविकास आघाडी सरकार आले तेव्हा ते महाराष्ट्राच्या हिताचे नव्हते. महाविकास आघाडीचे सरकार आले, तेव्हा पहिल्या दोन महिन्यातच मी आघाडी सरकारच्या विरोधात गेलो होतो. त्यावेळी मी मी नंदनवनला गेलो होतो. तिकडे मी एकनाथ शिंदे यांच्याशी साडेचार तास चर्चा केली होती. त्यावेळी मी त्यांच्या मनात उठावाची बीज पेरले”, असा गौप्यस्फोट विजय शिवतारे यांनी केला.

“नंदनवनमध्ये साडेचार तास चर्चा करताना मी एकनाथ शिंदे यांना सांगितले हे चालणार नाही. हे महाराष्ट्राच्या हिताचे नाही. तुम्ही उद्धव ठाकरेंना सांगा. प्रेशर करा हे तोडले पाहिजे. भाजप सेनेचे सरकार आले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या 70 सीट घालवल्या. उद्धव ठाकरेंनी भाजपच्या मतदारसंघात माणसं कामाला लावली. त्यामुळे भाजपनेही शिवसेनेचे मंत्री पाडले. हे सर्व उद्धव ठाकरे यांच्यामुळेच झाले”, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, “निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंचेसेटलमेंट झाले होते. कोणत्या सीट पाडायच्या, कोणत्या विजयी करायच्या आणि आकडेवारी कशी जुळवून आणायाची हे कट कारस्थान निवडणुकी आधीच झाले होते. महाविकास आघाडीनंतर झाली नाही. ती आधीच झाली होती. हे फसवत आहेत”, असा दावा त्यांनी केला.


हेही वाचा – कपबशा प्रकरण : बांधकाम विभागाच्या खुलाशानंतरही अमोल मिटकरी आपल्या आरोपांवर ठाम, म्हणाले…

First Published on: December 25, 2022 5:57 PM
Exit mobile version