घरताज्या घडामोडीकपबशा प्रकरण : बांधकाम विभागाच्या खुलाशानंतरही अमोल मिटकरी आपल्या आरोपांवर ठाम, म्हणाले...

कपबशा प्रकरण : बांधकाम विभागाच्या खुलाशानंतरही अमोल मिटकरी आपल्या आरोपांवर ठाम, म्हणाले…

Subscribe

बांधकाम विभागाच्या खुलाशानंतरही अमोल मिटकरी आपल्या आरोपांवर ठाम असल्याचे समजते. मिटकरींनी ट्वीट करत या घटनेची वस्तुस्थिती उद्या पत्रकारांना स्वतः दाखवुन देणार असल्याचे म्हटले. त्यामुळे आता अमोल मिटकरी नेमका काय खुलासा करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान नागपूरच्या आमदार निवासात कपबशा धुण्यासाठी शौचालयाचे पाणी वापरल्याचा व्हिडीओ राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शेअर केला होता. शिवाय, विधान परिषदेतही याबाबत मुद्दा मांडला होता. मात्र, त्यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ चुकीचा असून, बांधकाम विभागाने त्यासंदर्भात खुलासा केला. परंतु, बांधकाम विभागाच्या खुलाशानंतरही अमोल मिटकरी आपल्या आरोपांवर ठाम असल्याचे समजते. मिटकरींनी ट्वीट करत या घटनेची वस्तुस्थिती उद्या पत्रकारांना स्वतः दाखवुन देणार असल्याचे म्हटले. त्यामुळे आता अमोल मिटकरी नेमका काय खुलासा करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Winter Session Amol Mitkari Shared Video Toilet Water Using For Wash Cups Nagpur Mla Residence Tweet)

अमोल मिटकरींचे ट्वीट

- Advertisement -

बांधकाम विभागाच्या खुलाशानंतर राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट केले. यामध्ये त्यांनी लिहिले की, “सार्वजनिक बांधकाम विभागाने आमदार निवासातील शेअर केलेला शौचालयामधील किळसवाणा प्रकाराचा व्हिडिओ तिथला नसल्याचे पत्रकारांना खोटे सांगितले असले तरी वस्तुस्थिती उद्या पत्रकार बांधवांना स्वतः दाखवुन देईल त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होईल अशी अपेक्षा”.

बांधकाम विभागाचा खुलासा

- Advertisement -

राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला होता. त्यात आमदार निवासातील उपहारगृहातील टॉयलेटमध्ये कपबशा धुतल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र, बांधकाम विभागाने मिटकरींचे हे आरोप फेटाळले. मिटकरी यांनी ट्वीट केलेला व्हिडीओ आमदार निवासातील कँटिनचा नसून तो दुसऱ्याच कुठल्यातरी ठिकाणचा आहे, असा खुलासा बांधकाम विभागाने केला.

दरम्यान, अमोल मिटकरींच्या या ट्विटनंतर हे कपबशा प्रकरण दोन्ही सभागृहात प्रचंड गाजलं. त्यानंतर अमोल मिटकरी यांनी हा मुद्दा विधान परिषदेत मांडला. त्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी चहासाठी कपबशा न वापरता कागदी ग्लास वापरण्याचे सांगितले.


हेही वाचा – बलात्कारप्रकरणी शेवाळेंकडून थेट आदित्य ठाकरेंवर निशाणा, राष्ट्रवादीचं नाव घेत जोडलं दाऊद कनेक्शन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -