Maharashtra resident doctors Strike : १ ऑक्टोबरपासून राज्यातील निवासी डॉक्टर संपावर

Maharashtra resident doctors Strike : १ ऑक्टोबरपासून राज्यातील निवासी डॉक्टर संपावर

MBBS नंतर इतर कॉलेजमध्ये आता इंटर्नशिप करता येणार नाही, NMC ने नियमात केला बदल

Maharashtra resident doctors : कोरोना काळातील शैक्षणिक फी माफी, प्रोत्साहन भत्ता, पालिका महाविद्यालय निवासी डॉक्टरांचा टीडीएसचा मुद्दा व राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयातील हॉस्टेलसंबंधित समस्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते, मात्र एक महिना उलटूनही यावर अद्याप निर्णय जाहीर न झाल्याने राज्य़भरातील निवासी डॉक्टरांनी १ ऑक्टोबरपासून संपाचा इशारा दिला आहे. राज्यातील जवळपास ५ हजारांहून अधिक निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत. असे पत्रक महाराष्ट्र निवासी डॉक्टर राज्यव्यापी संघटने (MARD)कडून जारी करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील वैद्यकीय सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

य़ा मागण्यांविषयी स्मरणपत्र निवासी डॉक्टरांनी संबंधित विभागाला दिले आहे. या पत्रात मार्डने राज्य सरकारला मागण्याविषयी लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती केली असून, निवासी डॉक्टरांच्या भावनांचा विचार करत मार्डच्या राज्यस्तरीय बैठकीत याविषयी तात्काळ निर्णय न झाल्यास १ ऑक्टोबरपासून बेमुदत राज्यस्तरीयय संपावर जाण्याची निर्णय घेतला आहे. या मागण्या लेखी स्वरुपात मान्य होत नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही. असे माहितीपत्र प्रत्येक कॉलेज प्रशासनाला दिल्याची माहिती सेंट्रल मार्डने दिली आहे.

कोरोना काळातील निवासी डॉक्टरांची रुग्णसेवा आणि झालेले शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी शैक्षणिक फी माफीचे आश्वासन दिले होते. पण, अजूनही फी माफीचा निर्णय झाला नाही. शेवटी निवासी डॉक्टरांनी १ ऑक्टोबपर्यंत मागणी मान्य न झाल्यास संपावर जाणार असल्याचे स्पष्ट केल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. ५ हजारहून अधिक मार्डच्या निवासी डॉक्टरांनी राज्यस्तरीय संपावर जाणार आहे. वारंवार पाठपुरावा करूनही मागणी मान्य न झाल्याने संपाचे हत्यार उपसावे लागले अशी माहिती मार्डकडून (MARD) देण्यात आली आहे.


First Published on: September 30, 2021 11:10 AM
Exit mobile version