राहुल नार्वेकरांना तत्काळ मुंबईत बोलावलं, राजकीय वर्तुळात नवी चर्चा

राहुल नार्वेकरांना तत्काळ मुंबईत बोलावलं, राजकीय वर्तुळात नवी चर्चा

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत गुरुवारी, आज पुन्हा सुनावणी होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे काही आमदारांसोबत राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. अजित पवार यांच्यासोबत ५३ पैकी ४० आमदार असल्याचं म्हटलं जात होतं. याच सर्व पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना जपान दौरा सोडून तत्काळ मुंबईत बोलावण्यात आलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच आमदार जपानला गेल्याचे सांगितले जात होते. यावेळी राहुल नार्वेकर यांना तातडीने मुंबईला बोलावण्यात आलं. त्यामुळे राज्यात पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे ११ ते २३ एप्रिल या कालावधीत जपान या देशामध्ये महाराष्ट्र विधानमंडळ सदस्यांसमवेत अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे, या दौऱ्याच्या निमित्ताने जपान येथे रवाना होताना, असे वैयक्तिक व्टिटर हँडलवर झिरवाळ यांनी पोस्ट केली होती.

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ जपान दौऱ्यावर गेले आहेत. राज्यात अजित पवार भाजपसोबत नवी सत्ता स्थापन करणाची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांना जपान दौरा अर्ध्यावर सोडून तातडीने मुंबईत बोलवण्यात आलं.


हेही वाचा : मी राष्ट्रवादीतच आहे, आता प्रतिज्ञापत्रावर लिहून देऊ का?; अखेर अजित पवार


 

First Published on: April 18, 2023 3:10 PM
Exit mobile version