दहावी- बारावीच्या परीक्षांबाबत बैठक संपली, मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय

दहावी- बारावीच्या परीक्षांबाबत बैठक संपली, मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय

दहावीच्या परीक्षेबाबत मोठी अपडेट! 'या' तारखेपासून विद्यार्थ्यांना मिळणार Hall Ticket

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. परंतु या बैठकीत नववी आणि अकरावीच्या परीक्षांबाबत उद्या निर्णय घेणार असल्याचे निश्चित झाले. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत अद्याप गोंधळाचे वातावरण आहे. आजच्या बैठकीत दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत कोणताही तोडगा न निघाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी शालेय शिक्षणमंत्री चर्चा करत येत्या पाच ते सहा दिवसात दहावी आणि बारावीच्या परीक्षेबाबत निर्णय जाहीर करतील असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीच आता या परीक्षांबाबत अंतिम निर्णय देतील असे सांगितले जात आहे.

राज्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे ५ एप्रिलपासून राज्यात कडक निर्बंध घोषित करण्यात आले. नव्या निर्बंधांमुळे दहावी, बारावीच्या परिक्षांबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळ उडाला आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार आहेत का? झाल्या तरी कशा त्या पद्धतीने होणार? किंवा झाल्या नाही तर विद्यार्थ्यांना गुण कसे देणार ? अशा अनेक बाबींवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड महत्त्वपूर्ण बैठक घेत आहेत. यात राज्य सरकारने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा न देता थेट पास केले जाणार असे शालेय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले. मात्र दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांमधील गोंधळ कायम आहे. यात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रपरिषदेत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षेविना पास करा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची सांगितले.

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक यापूर्वीच जाहीर झाले आहे. त्यामुळे येत्या पाच ते सहा दिवसात विद्यार्थ्यांना पास करुन पुढच्या वर्गात टाकण्याबाबत कोणताही निर्णय न झाल्यास जाहीर वेळापत्रकाप्रमाणे लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहे.


 

First Published on: April 6, 2021 3:46 PM
Exit mobile version