माझे कुटुंब, माझी जबाबदारी, माझा पेपर, माझी मुलाखत; मुनगंटीवारांनी उडवली मुख्यमंत्र्यांची खिल्ली

माझे कुटुंब, माझी जबाबदारी, माझा पेपर, माझी मुलाखत; मुनगंटीवारांनी उडवली मुख्यमंत्र्यांची खिल्ली

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी उडालेली पाहायला मिळाली. अर्णब गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्या हक्कभंग प्रकरणावरुन विधानसभेत महाविकास आघाडीचे नेते आणि भाजपा आमनेसामने आले. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. माझे कुटुंब माझी जबाबदारी यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चिमटा काढला. माझे कुटुंब, माझी जबाबदारी…तसेच माझा पेपर, माझी मुलाखत आणि माझे पोलीस, माझा एफआयआर… अशा शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली.

राज्य सरकारने आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पुरवणी मागण्या सादर केल्या. यावर सुधीर मुनगंटीवार हे सभागृहात बोलत होते. यावेळी मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर चौफेर टोलेबाजी केली. एवढेच नाही तर शिवसेनासह राष्ट्रवादीच्या नेत्यांना देखील चिमटे काढले. सभागृहात विशेष हक्कभंग प्रस्तावावरून सुधीर मुनगुंटीवार आणि शिवसेना मंत्री अनिल परब यांच्या खडाजंगी झाली, वैयक्तिक टीका-टिप्पणी केल्यास हक्कभंग कसा होऊ शकतो असा सवाल भाजपाने केला, तर आमदारांना विशेषाधिकार दिले कशाला? तुम्ही कधी हक्कभंग वापरले नाही का? मागील ५ वर्षात किती हक्कभंग मांडले हे दाखवू का? सभागृह असताना कोर्टात जायचे कशाला? असा सवाल अनिल परब यांनी केला.

दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी माझए कुटुंब, माझी जबाबदारी या अभियानावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली. माझे कुटुंब, माझी जबाबदारी, माझे पेपर आणि माझी मुलाखत, माझे पोलीस आणि माझा एफआयआर असा शब्दात मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली. पुरवणी मागण्यावेळी सुधीर मुनगंटीवार सभागृहात बोलत होते, त्यावेळी त्यांनी पालघर साधु हत्येचा मुद्दाही उपस्थित केला. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात साधुंची हत्या कशी काय होऊ शकते? तुम्ही संवेदनशीलतेने काम करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री विरोधकांच्याबाबत घृणास्पद भावना ठेऊन वागत आहेत हे योग्य नाही असेही मुनगंटीवार म्हणाले.


हेही वाचा – मला पाडून दाखवाच; मुनगंटीवांरांना अजित पवारांचं आव्हान


 

First Published on: December 15, 2020 5:29 PM
Exit mobile version