गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा प्रेक्षकांचा राडा; वाचा काय घडलं?

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा प्रेक्षकांचा राडा; वाचा काय घडलं?

कोल्हापुरात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांवर कोल्हापूर पोलिसांनी बंदी घातली आहे. गणेशोत्सव सुरक्षेचा ताण पाहता पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे.

लावणी कलाकार गौतमी पाटील गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. गौतमीच्या लावणीमुळे तिचे नाव आता महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत गौतमीने अनेक कार्यक्रम केली असून, तिच्या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने गर्दी होत असे. मात्र नुकताच तिच्या एका कार्यक्रमात एवढी गर्दी झाली होती की, तरुणांनी कार्यक्रमात राडाच घातला. (Maharashtra Youths Are Rioting In The Stormy Crowd At Gautami Patils Shows)

सोलापूर जिल्ह्यातील नातेपुतेमध्ये तिच्या कार्यक्रमाला इतकी गर्दी झाली होती. बसायला जागा नव्हती त्यामुळे तरुणांनी कार्यक्रमात राडाच घातला. तरुणांनी खुर्च्या मोडल्या अन् बॅरिकेटिंग तोडून स्टेजपर्यंत गेले. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आहे.

नेमके काय घडले?

सोलापूरमधील नातेपुते गावात गौतमीच्या कार्यक्रमाला अबाल वृद्धांसह तरुणांनी प्रचंड गर्दी केली. या कार्यक्रमात प्रेक्षकांना बसण्यासाठी खुर्च्या ठेवल्या होत्या. पण खुर्च्या कमी आणि गर्दी जास्त झाल्यामुळे बसायला जागाच उरली नसल्यामुळे तरुणांनी खुर्च्या फेकल्या आणि जागा मिळेल तिथे उभे राहुन कार्यक्रमाचा आनंद घेतला. गर्दीला आवरण्यासाठी कार्यक्रमस्थळी बॅरिकेटिंग लावण्यात आले होते. तरुणांनी बॅरिकेटींग तोडून आत प्रवेश केला. त्यावरून गर्दी किती होती याचा अंदाज येईल. गौतमीचा डान्स सुरू असतानाच हा गोंधळ सुरू झाला.

गौतमीच्या डान्सवर, गाण्याच्या ओळींवर आणि तिच्या दिलखेच अदांवर नातेपुतेकर थिरकले. यावेळी कोणी फेटे उडवले, टोपी उडवली हे असे चित्र तिच्या कार्यक्रमात दिसून आले. दरम्यान, कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी लोकांना वेळीच सावरण्यास सुरुवात केली होती.

दरम्यान, लावणी कलावंत गौतमी पाटील राज्यात लोकप्रिय ठरताना दिसत आहे. तिच्या कार्यक्रमांना तूफान गर्दी झालेली दिसून येते. आपल्या दिलखेचक अदा आणि डान्समुळे तरुणाईसह इतर वयोवर्गातील लोक तिच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. त्यामुळेच तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी दिसून येते.


हेही वाचा – ‘गौतमी पाटील नाचत असताना चाहते थेट चढले स्टेजवरच आणि…’

First Published on: December 31, 2022 4:29 PM
Exit mobile version