घरताज्या घडामोडी'गौतमी पाटील नाचत असताना चाहते थेट चढले स्टेजवरच आणि...'

‘गौतमी पाटील नाचत असताना चाहते थेट चढले स्टेजवरच आणि…’

Subscribe

लावणी कलाकार गौतमी पाटील गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. गौतमीच्या लावणीमुळे तिचे नाव आता महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत गौतमीने अनेक कार्यक्रम केली असून, तिच्या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने गर्दी होत असे.

लावणी कलाकार गौतमी पाटील गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. गौतमीच्या लावणीमुळे तिचे नाव आता महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत गौतमीने अनेक कार्यक्रम केली असून, तिच्या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने गर्दी होत असे. मात्र नुकताच तिच्या एका कार्यक्रमात एवढी गर्दी झाली होती, की चाहत्यांनी थेट गौतमी पाटील नाचत असलेल्या स्टेजवर जाऊन राडा घातला. (Fans Threw Stones Crowd On Stage In Dance Performance Of Gautami Patil In Beed)

मिळालेल्या माहितीनुसार, बीडमध्ये एका हॉटेलच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात गौतमी पाटीलच्या लावणी डान्सचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी चाहते जमले होते. पण काही वेळाने गर्दी अधिक वाढल्याने कार्यक्रमास्थळी गोंधळ झाला. हा सर्व प्रकार पाहता गौतमी पाटीलने चालू कार्यक्रमात डान्स थांबवला.

- Advertisement -

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये गौतमी दिसत नसून, स्टेजवर फक्त प्रेक्षकांचाच घोळका दिसत आहे. परळी रोडवरील कार्यक्रमादरम्यान हा गोंधळ झाल्यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाली.

लावणी आणि त्याभोवती फिरणाऱ्या असंख्य कारणांमुळं चर्चेत असणारी गौतमी काही दिवसांपूर्वीच तिच्या एका कार्यक्रमादरम्यान, परफॉर्मन्स सुरु असताना केलेल्या अश्लील हावभावांमुळे अडचणीत सापडली होती. आरोप प्रत्यारोप, पत्रकार परिषद आणि स्पष्टीकरणांनंतर कुठे हा वाद निवळला. काही दिवसांपूर्वी तिच्या एका कार्यक्रमात एका शाळेचा छत तुटलं होतं, तसंच एकाचा मृत्यूही झाला होता.

- Advertisement -

हेही वाचा – ‘भाजपाच्या काही लोकांचे मेंदू किड्या-मुंग्यांसारखे…’ संजय राऊतांचे चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -