महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी रेकॉर्डब्रेक लसीकरण, मिनिटाला ४०० हून अधिकांना घेतली लस

महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी रेकॉर्डब्रेक लसीकरण, मिनिटाला ४०० हून अधिकांना घेतली लस

राज्यात मंगळवारपासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोनाविरोधी लसीकरणास सुरुवात झाली असतानाच लसीकरण मोहिमेचा वेगही वाढला आहे. राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी ६ लाख २ हजार १६३ नागरिकांना लस देण्यात आली. त्यामुळे आजही रेकॉर्डब्रेक लसीकरणाची नोंद राज्यात झाली आहे. यामुळे एका मिनिटाला ४०० हून अधिक नागरिकांनी राज्यात लस घेतली आहे. एकाच दिवशी एवढ्या संख्येने लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे. लसीकरणाची विक्रमी कामगिरी करणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही कौतुक केले आहे. काल एकाच दिवशी राज्यात ५ लाख ५२ हजार ९०९ जणांना लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदविला होता.

राज्यातील कोरोनाविरोधी लसीकरणात सातत्य टिकवत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. आतापर्यंत सुमारे २ कोटी ९१ लाखांहून अधिक लस मात्र राज्यात देण्यात आल्या आहेत. आज दिवसभरात ६ लाख २ हजार नागरिकांचे लसीकरण झाले. सायंकाळी सात वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून त्यात अजून वाढ होऊ शकते, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.


 

First Published on: June 23, 2021 9:57 PM
Exit mobile version