राज्यात महिंद्रा बडी कंपनी उभारण्यात येणार; नवे ५५ हजार रोजगार उपलब्ध होणार

राज्यात महिंद्रा बडी कंपनी उभारण्यात येणार; नवे ५५ हजार रोजगार उपलब्ध होणार

मागील अनेक महिन्यांपासून प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. हे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने राज्यातील रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, आता उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या चौथ्या बैठकीत राज्यात ७० हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. त्यामुळे सुमारे ५५ हजार रोजगारनिर्मिती होणार आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे या भागांतील औद्योगिक विकासाला चालना देण्याऱ्या उद्योगांबाबत या बैठकीत चर्चा झाली. (Mahindra will set up eV company 55 thousand new jobs will come in the Maharashtra)

मंत्रालयात मंगळवारी उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, प्रधान सचिव राजगोपाल देवरा, औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह आदी उपस्थित होते.

गडचिरोली व चंद्रपूरसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये ३ मोठे प्रकल्प उभारण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीने मान्यता

अमरावती व नागपूर विभागात वस्त्रोद्योग वाढीस चालना मिळावी यासाठी इंडोरामा कंपनीच्या उपकंपन्यांना मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करता यावी यासाठी त्यांच्या २५०० कोटींच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आलेली आहे.

देशाच्या व राज्याच्या इलेक्ट्रॉनिक व्हेईकल पॉलिसीनुसार, देशातील इलेक्ट्रिक व्हेईकल निर्मितीच्या क्षेत्रातील १०००० कोटींची गुंतवणूक असलेला महिंद्रा इलेक्ट्रिक व्हेईकल ऑटोमोबाईल्सचा पहिला प्रकल्प पुणे येथे सुरू होणार आहे. या माध्यमातून राज्यामध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारीत प्रकल्पांमध्ये विदेशी गुंतवणूक होणार आहे. तसेच, व्होक्सवॅगनबरोबर पुणे इथे तंत्रज्ञान, संशोधन व विकास संदर्भात प्रोटोटाइप बनविण्यात येणार आहे.

निप्रो फार्मा पॅकेजिंग कंपनी पुणे जिल्ह्यामध्ये नवीन तंत्रज्ञानावर आधारीत फार्मास्युटिकल ग्लास टयूबिंगचे उत्पादन करणार आहे. यासाठी ही कंपनी दोन टप्प्यात १६५० कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्यातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष २००० लोकांना रोजगार मिळणार आहे.


हेही वाचा – School Holidays 2023 : विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षात मिळणार ‘इतक्या’ सुट्ट्या

First Published on: December 14, 2022 11:38 AM
Exit mobile version