मुंबई-पुणे महामार्गाचा ‘हा’ रस्ता वाहतुकीस बंद

मुंबई-पुणे महामार्गाचा ‘हा’ रस्ता वाहतुकीस बंद

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग हा महाराष्ट्रातील सर्वात व्यस्त महामार्गांपैकी एक आहे. या द्रुतगती मार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करत असतात. या एक्स्प्रेस वेमुळे पुणे-मुंबईकडे ये-जा करणाऱ्या लोकांचा बराच वेळ वाचतो. परंतु, आज मुंबई-पुणे महामार्गाचा मुख्य रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे. (main road of Mumbai Pune highway is closed for traffic)

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या पुण्याकडे जाणाऱ्या कळंबोली गावाजवळ ओव्हर हेड गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्याचे असलेने या वाहिनीवरील वाहतूक रविवार १२ रोजी दुपारी १२ ते दुपारी ३ या कालावधीत पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे. ही वाहतूक कळंबोली गाव ते पनवेल सर्कल ते देवांश ईन हॉटेल जवळून पनवेल रॅम्प पासून पुन्हा हुतगती मार्गे पुणेकडे अशी वळविण्यात येणार आहे.

या कालावधीत द्रुतगती मार्गावरील वाहनांनी वरील पर्यायी मार्गाचा उपयोग करावा. तसेच, वरील कालावधी दरम्यान द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी ९८२२४९८२२४ या क्रमांकावर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या ९८३३४९८३३४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे अवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या मार्फत करण्यात आले आहे.


हेही वाचा – कोश्यारींचा राजीनामा मंजूर करण्यास उशीर झाला : उदयनराजे भोसले

First Published on: February 12, 2023 2:25 PM
Exit mobile version