कोल्हापूरात एस टी-सुमोचा भीषण अपघात; ४ जण ठार

कोल्हापूरात एस टी-सुमोचा भीषण अपघात; ४ जण ठार

प्रातिनिधिक फोटो

गडहिंग्लज तालुक्यातील महामार्गावर हरळी गावाजवळ आईच्या अंत्यसंस्काराला जाताना भीषण अपघात होऊन, दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा याच ठिकाणी एसटी आणि सुमोमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. एसटी आणि सुमोमध्ये भीषण अपघात झाला असून या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

आजरा तालुक्यातील सरंबळवाडी येथे उद्योजक रमेश रेडेकर यांनी आयोजित केलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी गडहिंग्लजमधील नूल येथून नामदेव चव्हाण हे आपल्या सात कार्यकर्त्यांसह मेळाव्याला गेले होते. मेळावा आटोपून परतताना गडहिंग्लज-महागाव रस्त्यावर अनिकेत हॉटेलनजीक कोल्हापूर-दोडामार्ग या बसने सुमोला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत सुमोचे मालक आणि चालक नामदेव चव्हाण, त्यांचा मुलगा मनोज चव्हाण, चंद्रकांत गरुड, आप्पा सुपले या चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. राजू जाधव, दिलीप सुपले आणि राहुल सावंत हे तिघेही गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

First Published on: April 13, 2019 5:03 PM
Exit mobile version