‘शरद पवारांनंतर आता मल्लिकार्जुन खर्गेंनी काँग्रेस…’ आशिष देशमुखांचा मिश्किल सल्ला

‘शरद पवारांनंतर आता मल्लिकार्जुन खर्गेंनी काँग्रेस…’ आशिष देशमुखांचा मिश्किल सल्ला

देशमुख म्हणाले की, शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचा आदर्श घेत आता मल्लिकार्जुन खर्गे यांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद सोडावे, असा मिश्किल सल्ला दिला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर स्वरुपाची टीका केल्याने माजी आमदार आशिष देशमुख यांचं निलंबन करण्यात आलं होतं. ते त्यांच्या बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. आता पुन्हा एकदा त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना मिश्किल सल्ला दिला आहे. देशमुख म्हणाले की, शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचा आदर्श घेत आता मल्लिकार्जुन खर्गे यांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद सोडावे, असा मिश्किल सल्ला दिला आहे. ( Mallikarjun Kharge should leave Congress president post like Sharad Pawar did in NCP Ashish Deshmukhs advice  )

आशिष देशमुख म्हणाले की, काँग्रेसमध्ये सर्वस्वी निर्णय हे राहुल गांधीच घेतात. 28 ऑक्टोबर 2022 रोजी खर्गे राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. तेव्हा निवडणुकीत आम्ही शशी थरुर यांच्यासोबत होतो. मात्र, निवडून सहा महिने झाले तरी अजूनपर्यंत मल्लिकार्जुन खर्गे यांना त्यांच्या एआयसीसीमधील महासचिव, इतर पदाधिकारी असतील. तसेच, सीडब्ल्यूसी होऊन दोन महिने होत आहे. मात्र, सीडब्ल्यूसीची निवड राहुल गांधी करु देत नाही आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून शरद पवार यांनी एक प्रशंसनीय आणि दुसऱ्या लोकांना प्रेरित करणार निर्णय घेतला आहे, असे देशमुख म्हणाले.

…म्हणून मल्लिकार्जुन खर्गेंनी अध्यक्षपद सोडावं- देशमुख

शरद पवार यांनी राजीनामा देऊन या वयात कौतुकास्पद काम केलं आहे. त्याच पद्धतीने मल्लिकार्जुन खर्गे यांनीही सातत्याने होत असलेल्या अपमानच्या पार्श्वभूमीवर पदमुक्त व्हावं. तसचं तरुण व्यक्तीला काँग्रेसच्या अध्यत्रपदी विराजमान होण्याची संधी मिळाली पाहिजे. शशी थरुर यांच्यामागे देशातील तरुण उभे राहिले होते. त्यांना जर संधी मिळाली असती तर काँग्रेसला चांगले दिवस आले असते. आता शरद पवारांचा आदर्श घेऊन काँग्रेसमध्ये वयोवृद्ध झालेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांनी ज्यांना सातत्याने काम करण्यासाठी राहुल गांधी यांच्याकडून आदेश घ्यावे लागतात. त्यांनी पायउतार झाल्यास त्यांची निवृत्ती ही ग्रेसफूल ठरेल. शशी थरुर यांच्याकडे पद मिळाल्यास ते या पदाला अधिक चांगला न्याय देऊ शकले असले, असेही आशिष देशमुख म्हणाले.

( हेही वाचा: Barasu Refinary: महाराष्ट्रात राख आणि गुजरातला रांगोळी; ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल )

 

First Published on: May 4, 2023 3:21 PM
Exit mobile version