पुण्यात तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

पुण्यात तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

पुण्यात तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

पुण्यात कामाला असलेला तरुण पिंपरी-चिंचवड मधील मित्रांना भेटायला आला होता. मात्र मित्रांना भेटण्याची त्याची ती भेट अखेरची ठरली आहे. बऱ्याच दिवसांनी भेटलेल्या मित्रांसोबत पोहायला गेलेल्या मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शहरातील मोशी येथे घडली आहे. नागेश गादगे अस मृत्यू झालेल्या २२ वर्षीय तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

नेमके काय घडले?

सोलापूर येथील रहिवासी असलेला नागेश हा गेल्या दहा दिवसांपासून पुण्यात आला होता. तो पुण्यात एका ठिकाणी काम करायचा. तो मित्रांना भेटण्यासाठी बुधवारी सकाळी तो मोशी येथील समीर आणि दुसऱ्या एका मित्राला भेटायला गेला होता. या मित्रमंडळींमध्ये गावाकडील गप्पा गोष्टी चांगल्या रंगल्या तेवढ्यात मोशी येथील तलावात पोहायचे ठरले. त्याप्रमाणे मोशी येथील तलावात पोहायला तिघे जण गेले. मात्र नागेशला पोहता येत नसल्याने तो कडेलाच बसून अंघोळ करत होता. तर समीर आणि दुसरा मित्रा तलावाच्या मध्यभागी जाऊन पोहण्याचा आनंद घेत होते. त्याच दरम्यान, नागेशचा पाय घसरला आणि तो थेट तलावात बुडायला लागला. त्याने दोन्ही हात वर करत मित्रांकडे मदतीची याचना केली. परंतु, दोन्ही मित्र मध्यभागी असल्याने त्यांना येण्यासाठी उशीर झाला. तोपर्यंत नागेश पाण्यात बुडाला होता. मित्रांनी नागेशला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तो नागेश त्यांना सापडला नाही. दरम्यान पुण्यातून मोशी येथे भेटायला आलेल्या नागेश आणि इतर दोन मित्रांची ही शेवटची भेट ठरल्याने मित्रांनी हळहळ व्यक्त केली आहे.

अर्धा तासाने सापडला मृतदेह

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचून त्यांनी नागेशचा शोध घेतला. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर नागेशचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. नागेश हा मूळचा सोलापूरचा असून ते नेहमी घराबाहेर असायचा अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.


वाचा – गोरेगावच्या छोटा काश्मीरमधील तलावात एक जण बुडाला


 

First Published on: January 16, 2019 12:56 PM
Exit mobile version