आमदार संतोष बांगरांच्या मारहाण प्रकरणातील व्यवस्थापक सर्व आरोप फेटाळत म्हणाले…

आमदार संतोष बांगरांच्या मारहाण प्रकरणातील व्यवस्थापक सर्व आरोप फेटाळत म्हणाले…

शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत कामगारांना जेवणाचे डब्बे पुरवणाऱ्या गोडाऊनच्या व्यवस्थापकाला मारहाण केली होती. शुभम हरण असे मारहाण झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. मारहाण होतानाचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मडियात वेगाने हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दरम्यान विरोधी पक्षनेत्यांनी संतोष बांगरांच्या कृत्याचा निषेध केला आहे. या सर्व घटनाक्रमानंतर गोडाऊनचे व्यावस्थापक शुभम हरण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार संतोष बांगर यांनी केलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत.

व्यावस्थापक काय म्हणाले –

घडलेल्या प्रकाराबाबत बोलताना सकाळी दहा साडे दहाची वेळ होती. त्यावेळी आम्ही उरलेले टाकाऊ अन्न एमआयडीसीमधील एका कचरा डेपोत टाकण्यासाठी घेऊन जात होतो. हे टाकाऊ अन्न घेऊन जात असताना आमदार संतोष बांगर यांनी गोडाऊनला भेट दिली. तुम्ही लोकांना निकृष्ट दर्जाचे अन्न खाऊ घालता, त्यांच्या जीवाशी खेळता, असे आरोप बांगर यांनी केले. त्यासाठी त्यांनी काही व्हिडीओ दाखवले. मात्र, त्या व्हिडीओत दिसणारे अन्न गोडाऊनच्या बाहेरील असून ते उरलेले टाकाऊ पदार्थ होते. जे कचऱ्यात टाकून देणार होतो. याच अन्नाचा व्हिडीओ दाखवून बांगर यांनी मारहाण केली, असे शुभम हरण म्हणाले.

बांगरांचे आरोप फेटाळले –

बांगरांच्या आरोपाबाबत विचारले असता, व्यवस्थापक शुभम हरण यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी सांगितले की असा कुठलाही प्रकार येथे घडत नाही. ठरल्याप्रमाणे आम्ही कामगारांना जेवण देतो. जे जेवण देतो, तेही व्यवस्थि देतो. जेवणाबाबत आमच्याकडे अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. पण साहेबांनी जे आरोप लावले आहेत, याबाबत स्पष्टीकरण मला माहीत नाही.

First Published on: August 16, 2022 6:15 PM
Exit mobile version