माणिकराव गावितांचे पीए सापडले, पण ‘या’ अवस्थेत!

माणिकराव गावितांचे पीए सापडले, पण ‘या’ अवस्थेत!

माणिकराव गावितांचे पीए सापडले, पण 'या' अवस्थेत!

मागील दोन दिवसांपासून कॉंग्रेसचे माजी खासदार माणिकराव गावित यांचे पीए भगवान रामचंद्र गिरासे हे बेपत्ता होते. गिरासे हे मुंबईच्या टिळक भवनाजवळून बेपत्ता झाले होते. तेव्हापासून मुंबई पोलिस त्यांच्या शोधात होते. अखेर त्यांचा शोध सोमवारी गुजरातमध्ये लागला आहे. भगवान गिरासे यांची अवस्था पाहता त्याचे अपहरण झाले असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.

‘अशा’ अवस्थेत सापडले

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरासे गुजरातमध्ये सापडले तेव्हा त्यांचे केस आणि मिशा कापलेल्या अवस्थेत होते. दरम्यान, पोलिसांनी भगवान यांना त्यांच्या कुटुंबियांकडे सोपविले. पोलिस तपासात त्यांनी काहीही सांगितलेले नाही. अपहृणकर्त्यांनी त्यांना गुंगीचे औषध दिले होते.

तेव्हा ‘मी रेल्वेतून पडलो’…

त्यामुळे, ते सापडले तेव्हा देखील गुंगीतच होते. त्यांच्या मानेवर इंजेक्शन दिल्याने सूज झाल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा ‘मी रेल्वेतून पडलो’ फक्त ऐवढेच भगवान यांना आठवत आहे. त्यांच्यावर सध्या घरीच उपचार सुरू आहेत. तर पोलीस या प्रकरणात आता अधिक तपास करत आहेत.

First Published on: April 1, 2019 1:06 PM
Exit mobile version