मराठा क्रांती मोर्चा आक्रमक : शासनाच्या घोषणापत्रकांची होळी

मराठा क्रांती मोर्चा आक्रमक : शासनाच्या घोषणापत्रकांची होळी

मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाची पुढील निर्णायक दिशा ठरवण्यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीला नाशिकमध्ये सुरूवात झाली आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखालील औरंगाबाद रोडवरील मधुरम बँक्वेट हॉल मध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीपूर्वी मराठा समाजाकडून राज्यसरकारनं केलेल्या ८ घोषणांच्या पत्रकांची होळी करण्यात आली. यावेळी शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.

प्रारंभी खासदार संभाजी भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विश्वविक्रम तलवारीचे अनावरण करुन पुजन करण्यात आले. यानंतर सकल मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य स्तरावरील बैठकीत राज्यभरातून आलेल्या जिल्हा समन्वयकांनी आपापले विचार मांडले तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात करत न्यायालयात मराठा आरक्षणाची भुमिका काय असेल याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली त्याच प्रमाणे आगामी काळात सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करावयाची आंदोलनाची दिशा याबाबतही तज्ज्ञांची मते जाणून घेण्यात येणार आहे.

या बैठकीला खासदार हेमंत गोडसे,  अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, श्रीमंत यशराजे भोसले ,आमदार सीमा हिरे, अ‍ॅड. राहुल ढिकले आमदार दिलीप बनकर माजी आमदार नितीन भोसले सुनील बागुल, अ‍ॅड. शिवाजी सहाणे, नाना महाले, अव्दय हिरे, अर्जुन टिळे, अमृता पवार, वत्सला खैरे, शिवाजी चुंबळे, माधवी पाटील, करण गायकर, गणेश कदम, तुषार जगताप, तुषार गवळी, योगेश कापसे, किशोर चव्हाण आदीसह कायदेतज्ञ तसेच राज्यभरतील समन्वयक उपस्थित होते.

First Published on: September 26, 2020 1:49 PM
Exit mobile version