विधान परिषदेत पुन्हा मराठा आरक्षणावावरून गोंधळ

विधान परिषदेत पुन्हा मराठा आरक्षणावावरून गोंधळ

विधान भवन

हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यावर एक आठवडा दोन दिवस झाले तरी देखील विधान सभा असो वा विधान परिषद दोन्ही सभागृहाचे कामकाज विरोधकांच्या गोंधळामुळे लवकर गुंडाळायची नामुष्की सरकारवर ओढवली आहे. विधानसभेप्रमाणेच विधान परिषदेत देखील आरक्षण, दुष्काळ यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर भारी पडल्याचे चित्र आहे. मंगळवारी देखील विधान परिषदेचे काम सकाळी १० वाजता सुरू झाले. विशेष लक्षवेधी झाल्यानंतर नियमित वेळेनुसार सव्वा बारा वाजता विधान परिषदेचे कामकाज सुरू झाले. मात्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते स्थगन प्रस्ताव मांडत सरकारवर जोरदार हल्ला केला असल्याचे पाहायला मिळत आहे.

बोडअळीवरुन सरकारवर टीका

राज्यामध्ये दररोज चार आत्महत्या होत आहेत. हे महाभयंकर आहे. पण सरकार ठोस निर्णय घेत नाही. तसेच बोडअळी सदर्भात अनुदान मिळेल असे चंद्रकात पाटील यांनी सांगितले होते. तसेच मागील डिसेंबर महिन्यात बोडअळीची नुकसान भरपाई म्हणून ३४ हजार ७०० अनुदान देतो असे सांगितले होते. पण आजही मदत मिळाली नाही असे सांगत सरकारवर टीका केली. तसेच मराठा आरक्षणाबाबतीत निर्णय होत नाही. मात्र धरपकड सुरू आहे. त्यामुळे आरक्षण, दुष्काळ यावर निर्णय झाल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही असे सांगत आक्रमक भूमिका घेतली. त्याच वेळी सरकारी पक्षाकडून चंद्रकांत पाटील यांनी याच अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक येईल. त्यामुळे आम्हाला त्याचे क्रेडिट मिळेल म्हणून हे सर्व सुरू असल्याचा आरोप विरोधकांवर केल्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.


वाचा – मराठा आरक्षण देण्याबाबत सरकारच्या मनात पाप – धनंजय मुंडे


विरोधकांकडून सरकारचा निषेध

विरोधकांनी वेलमध्ये उतरत सरकार विरोधात घोषणाबाजी देत सरकारचा निषेध केला. तसेच मराठा आरक्षणासाठी आयोगाने दिलेला अहवाल, तसेच टीस (TISS) ने दिलेला धनगर समाजाचा अहवाल आल्याशिवाय कामकाज होऊ न देण्याचा पवित्रा मुंडे यांनी घेतला होता. त्यानंतर सभागृहात गदारोळ निर्माण झाला होता. त्यामुळे ३५ मिनिटे सभागृहाचे कामकाज तहकूब झाले होते. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू झाले. मात्र तरी देखील विरोधक आक्रमक असल्याचे पाहून आणि विरोधक आणि सत्ताधारी यांची घोषणापासून सभापती दत्तात्रय सावंत यांनी दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले आहे. दरम्यान विनोद तावळे आणि आमदार नागो गाणार यांनी गोंधळातच आश्वासन समितीचा अहवाल ठेवला.


वाचा – दु्ष्काळाच्या मुद्यावरून खडसे जोमात, सरकार कोमात


 

First Published on: November 27, 2018 5:58 PM
Exit mobile version