घरमुंबईमराठा आरक्षण देण्याबाबत सरकारच्या मनात पाप – धनंजय मुंडे

मराठा आरक्षण देण्याबाबत सरकारच्या मनात पाप – धनंजय मुंडे

Subscribe

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना निशाणा बनवला आहे. मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न उपस्थित करत त्यांनी अधिवेशन दणाणून सोडले.

सरकार म्हणते चर्चा करायची… चर्चा करायची… कसली चर्चा करायची आहे सरकारला… कर्जमाफी फसवी… मराठा, धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवायचे… आधी अहवाल सदनात ठेवा… तेव्हाच सभागृह चालू देवू, असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेमध्ये दिला. या आठवड्यातील अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. मराठा, धनगर समाजाचे सरकारकडे आलेले अहवाल सदनात ठेवा… दुष्काळग्रस्तांना त्वरीत मदत द्या या गंभीर विषयावर सरकार सकारात्मक निर्णय घेत नसल्याने गेले दोन आठवडे अधिवेशनाचे कामकाज विरोधी सदस्य बंद पाडत आहे.

वाचा : शेतकऱ्यांसाठी तिजोरी खाली करा परंतु ठोस निर्णय घ्या – धनंजय मुंडे

- Advertisement -

टीसचा अहवाल लपवून ठेवण्याचा आरोप

अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही मराठा समाजाला मागास आयोगाचा अहवाल आणि धनगर समाजाला दिलेला टीसचा अहवाल सदनाच्या पटलावर ठेवावा या मागणीसाठी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना सभागृह दणाणून सोडले आहे. आज दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारचे आरक्षण द्यायचं की नाही हे स्पष्ट धोरण नाही. या सदनामध्ये आरक्षणाचं विधेयक आलं पाहिजे. टीसचा अहवाल का लपवून ठेवता असा सवाल करतानाच धनगर आरक्षणाचा ठाराव करावा. मुस्लिम आरक्षणाचे विधेयक आले पाहिजे. या सर्व सुरुवातीपासून मागण्या करत आलो आहोत. मागास आयोग, टीसचा अहवाल ठेवा त्याशिवाय सदनाचे काम काही होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका धनंजय मुंडे यांनी मांडली.

वाचा : मराठा आरक्षणात अडथळा आणण्याची आमची भूमिका नाही – अजित पवार

- Advertisement -

बोन्डअळीची नुकसान भरपाईच नाही

दुष्काळावर चर्चा काय करायची तुमच्या फसव्या घोषणा ऐकायला का? असा सवाल करत बोन्डअळीची १०० % नुकसान भरपाई मिळालेला एकतरी शेतकरी दाखवा नाहीतर राजीनामा द्या नाहीतर मी देईल, असे आव्हान त्यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले.

वाचा : मराठा आरक्षण: सत्ताधारी – विरोधक आमदार एकमेकांच्या अंगावर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -