पुण्यातील ऐतिहासिक मार्केटमध्ये भीषण आग, २५ दुकाने जळून खाक

पुण्यातील ऐतिहासिक मार्केटमध्ये भीषण आग, २५ दुकाने जळून खाक

पुण्यातील ऐतिहासिक मार्केटमध्ये भीषण आग, २५ दुकाने जळून खाक

पुणे कॅम्प परिसरातील छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये मंगळवारी पहाटे भीषण अग्नितांडव पाहयला मिळाला. सकाळी चारच्या सुमारास लागलेल्या या आगीत मार्केट परिसरातील २५ दुकाने जळून खाक झाली आहेत. ही आग शार्टसर्किटमुळे लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सुदैवाने या आगीत कोणताही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. या आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली, पण तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात पसरली होती. त्यामुळे या आगीच्या घटनेमुळे स्थानिकांची तारांबळ उडाली. परंतु अग्निशमन दलाला ८ गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात अखेर काही तासांनी यश आले.

या मार्केटमध्ये मोठ्याप्रमाणात मच्छी आणि चिकनची दुकाने आहेत. त्यामुळे या आगीत तब्बल २५ दुकाने जळाली आहेत. तसेच दुकानातील कोंबड्या, बकऱ्या आणि मच्छी देखील आगीत होरपळल्या आहेत. त्यामुळे या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. छत्रपती शिवाजी मार्केट हे दोनशे वर्षापूर्वीपासूनचे ब्रिटिशकालीन मार्केट आहे. त्यामुळे या मार्केटमध्ये मासे, चिकन आणि भाजीपाला, फळ भाज्यांची अनेक दुकाने आहेत. या आगीसंदर्भात मार्केटमधील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मंजूर शेख यांनी सांगितले की, या आगीच्या घटनेत मार्केटमधील १७ मासे विक्रेत्यांच्या गाळ्याचे आणि आठ चिकन विक्रेत्यांच्या गाळ्यांचे मोठे नुकसान झाले असून ही संपूर्ण दुकाने आगीत जळून राख झाली आहेत. त्यामुळे अनेक दुकान मालकांचे लाखोचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पुणे शहरातील कॅम्प परिसरातील छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये मच्छी, चिकन आणि अन्य वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते. मार्केटमध्ये आज पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती आम्हाला मिळाली, त्यानुसार घटनास्थळी धाव घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं.

First Published on: March 16, 2021 2:56 PM
Exit mobile version