मत कहो बुरा उसको…, संजय राऊत यांचे ट्वीट चर्चेत

मत कहो बुरा उसको…, संजय राऊत यांचे ट्वीट चर्चेत

मुंबई : शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून राज्यातील राजकारण शिंदे आणि ठाकरे गट तसेच भाजपा भोवती फिरत आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या निशाण्यावर भाजपा असला तरी, प्रामुख्याने शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी ‘मत कहो बुरा उसको…’ हा शेर आपल्या ट्विटर हॅण्डलवरून शेअर केला आहे. त्यावरून आता चर्चा रंगली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज, शुक्रवारी मुंबईदौऱ्यावर आले होते. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मुंबईत मुंबई – शिर्डी आणि मुंबई – सोलापूर या दोन वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण करण्यात आले. अवघ्या 22 दिवसांत पंतप्रधान मोदी यांचा हा दुसरा मुंबई दौरा आहे. 19 जानेवारी 2023ला मुंबईतील दोन मेट्रो मार्गांचे लोकार्पण यासह 38 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले होते. लवकरच होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही मोर्चेबांधणी असल्याचे सांगण्यात येते.

खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून टीका केली आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक त्यांच्या पक्षाने फार गांभीर्याने घेतली आहेत. पण देशासमोर वेगळे प्रश्न आहेत. पंतप्रधानांना मुंबईत यावे लागते म्हणजे भाजपाचे राज्यातले नेतृत्व कमकुवत आहे, असा याचा अर्थ होतो. पण सरकार ट्रिपल असो किंवा चार इंजिनचे, मुंबईत शिवसेनेचाच भगवा फडकणार, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

हेही वाचा – वंदे भारत ट्रेनमुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला मिळणार अधिक गती – पंतप्रधान नरेंद्र मोदी

त्यापाठोपाठ त्यांनी ‘मत कहो बुरा उसको…’ या शीर्षकाने एक व्हिडीओ रीट्वीट केला आहे. ‘वह बेवफा है तो क्या, मत कहो बुरा उसको… के जो हुआ सो हुआ, खुश रखे खुदा उसको… नजर ना आये तो उसकी तलाश में रहना… कहीं मिले तो पलट कर ना देखना उसको…’ असा हा शेर आहे.

हेही वाचा – निवडणूक लढविण्यासाठी लोकशाहीत सर्वांना स्वातंत्र्य, पोटनिवडणुकीवरून अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया

First Published on: February 10, 2023 11:06 PM
Exit mobile version