Good News: इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यासाठी बारावीला गणित, भौतिकशास्त्र विषयाची अट रद्द

Good News: इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यासाठी बारावीला गणित, भौतिकशास्त्र विषयाची अट रद्द

Good News: इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यासाठी बारावीला गणित, भौतिकशास्त्र विषयाची अट रद्द

देशात १० पैकी प्रत्येकी ७ मुलांचे स्वप्न हे इंजिनिअर होण्याचे असते. या स्वप्नाला साकार करण्यासाठी विद्यार्थ्यी कठोर मेहनतही घेतात. परंतु काही विद्यार्थ्यांना अवघड वाटणारे गणित आणि भौतिकशास्त्र विषयांमुळे इंजिनिअरिंगला प्रवेश घेता येत नाही. इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यासाठी गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय प्रमुख आणि महत्त्वाचा टप्पा मानला जातो. परंतु आता बारावीमध्ये गणित आणि भौतिकशास्त्र विषय इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक नाही असा निर्णय ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन या संस्थेने घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश घेता येणार आहे. गणित आणि भौतिकशास्त्र विषयाच्या अटीमुळे अनेक विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला अभ्यास घेता येत नाही अशा विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा असेल तर बारावीमध्ये गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय महत्त्वाचे होते. या विषयांसह AICTE या संस्थकडून इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी एकूण १४ विषयांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीतील कोणत्याही तीन विषयांमध्ये किमान ४५ टक्के गुणांसह विद्यार्थी उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. इंजिनिअरिंगसाठी वेगवेगळ्या विषयांची पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता यावा यासाठी एआयसीटीई या संस्थेने निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी २०२१-२२ या वर्षापासून करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

या १४ विषयांचा समावेश

इंजिनिअरिंग प्रवेश घेण्यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र,गणित,कॉम्प्युटर सायन्स,इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉर्मेशन, टेक्नॉलॉजी, जीवशास्त्र, इन्फॉर्मेशन प्रॅक्टिस, बायोटेक्नॉलॉजी, टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज आणि उद्योजकता या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

इंजिनिअरिंगसाठी गणित आणि भौतिक शास्त्र विषयांची अट रद्द केल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्यावर मोठा परिणाम होईल असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. गणित हा विषय इंजिनिअरिंगसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे इंजिनिअरिंगचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना अभ्यास समजायला कठीण जात नाही असेही मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

First Published on: March 12, 2021 4:36 PM
Exit mobile version