एमडी, एमएसच्या परीक्षा पुढे ढकला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोदींना पत्र

एमडी, एमएसच्या परीक्षा पुढे ढकला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोदींना पत्र

देशात कोरोनाचं संकट अधिकच गडद होताना दिसत आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होतं आहे. कोरोना संकटाचा सामना करण्यात सर्व डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी आघाडीवर आहेत. दरम्यान, मेडिकल काउंसिल ऑफ इंडियाने एमडी आणि एमएसच्या परीक्षा ३० जुलैच्या आधी घेण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर एमडी आणि एमएसची परीक्षा डिसेंबर २०२० पर्यंत पुढे ढकलली जावी अशी मागणी करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं आहे. या पत्रात भारत सरकारकडून मेडिकल काउंसिल ऑफ इंडियाला डिसेंबर २०२० पर्यंत परीक्षा स्थगित करण्याची विनंती केली जावी, असं म्हटलं आहे.

“अंतिम वर्षाचे निवासी डॉक्टर कोरोना महामारीशी लढा देण्यास महत्त्वाची भूमिका निभावत असून एमडी/एमएसच्या परीक्षा डिसेंबर २०२० पर्यंत पुढे ढकलण्यासंबंधी आपण मध्यस्थी करत मेडिकल काउंसिल ऑफ इंडियाला आदेश द्यावेत,” अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.


हेही वाचा – ‘तू गाड्या वापरणं बंद केलंस का?’; आव्हाडांनी अक्षय कुमारवर साधला निशाणा


 

First Published on: June 25, 2020 1:44 PM
Exit mobile version