पदव्युत्तर वैद्यकीय परीक्षा २५ ऑगस्टपासून

पदव्युत्तर वैद्यकीय परीक्षा २५ ऑगस्टपासून

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षा २५ ऑगस्टपासून होणार आहेत. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी संकेतस्थळ पाहावे असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षा कोविड-१९ आजाराचा प्रादुर्भाव पहाता पुढे ढकलण्यात आल्या होत्या. विद्यापीठाकडून उन्हाळी सत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या २५ ऑगस्ट २०२० पासून प्रारंभ होणार आहे. परीक्षेसाठी प्रत्येक पेपरनंतर एक दिवसाची सुटी परीक्षार्थ्यांना देण्यात आली आहे. पीजी मेडिकल एमडी (सर्व स्पेशल), एमएस (सर्व स्पेशल), एम.एस्सी. (मेडीकल बायोकेमिस्ट्री), एम.एस्सी. (मेडिकल मायक्रोबायोलॉजी) तसेच पीजी डिप्लोमा मधील डीडीव्हीएलएल, डीपीएमएम, डीसीसीएच, डीएमएमआरडीडी, डीएए, डीजीओ, डीपीपीएच, डीएफएफएम, डीटीसीडी, डी ऑर्थो., डीएलओ, डीओ., डीसीपी, डीडी, डीएचए, डीएमएम, डीआरएम आणि डीएम आणि एमसीएच आदी सर्व अभ्यासक्रमांचे लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा झाल्यानंतर तातडीने त्यांच्या प्रक्टिकल परीक्षा घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.

First Published on: July 12, 2020 8:00 PM
Exit mobile version