पक्षविरोधी कारवाई भोवली, ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

पक्षविरोधी कारवाई भोवली, ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Ekanth shinde) यांच्या बंडामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदे यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार असल्याने शिवसेना खिळखिळी झाली आहे. ठाण्यातील शिवसेनेचे माजी महापौर नरेश म्हस्के (Former Mayor Naresh Mhaske) यांनी आपल्या जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. आता, ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे (Former Mayor Minakshi shinde) यांची शिवेसनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली. दरम्यान, पक्षाविरोधी कारवाई होत असल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. (Meenakshi Shinde Expelled From Shivsena)

हेही वाचा शिवसेनेला मोठा धक्का, नरेश म्हस्के यांचा राजीनामा

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यात सत्तासंघर्ष निर्माण झाला आहे. सत्तासंघर्षाचा आजचा आठवा दिवस असून आजही नाट्यमय घडामोडी घडत आहेत. ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांना अनेक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे. ठाण्यासह आजूबाजूच्या शहारातूनही त्यांना समर्थन वाढत आहे. त्यातच, ठाणे जिल्हासंघटक आणि माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही हकालपट्टी करण्यात येत असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना दोनदा फोन, भाजप हायकमांडशी संपर्क साधण्याचा प्रयत्न

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. याबद्दल म्हस्के यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यांनी म्हटले आहे की, गेले अडीच वर्षे आपल्या संघटनेची “राष्ट्रवादी” गळचेपी चालली आहे. त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. मात्र आपण शिवसैनिक होतो, आहे आणि राहणारच असेही नमूद केले आहे. त्याचबरोबर भगवे आमचे रक्त तळपते, तप्त हिंदवी बाणा… जात गोत्र अन धर्म अमुचा शिवसेना, शिवसेना, शिवसेना…! असे म्हटले तसेच शेवटी जय महाराष्ट्र! म्हणून म्हस्के यांनी कोड्यात टाकले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाण्यातून पहिल्यांदा राजीनामा म्हस्के यांनी दिल्याने म्हस्के हे शिवसेनेचे की शिंदे यांचे महापौर होते असाच सवाल उपस्थित होत आहे.

First Published on: June 28, 2022 2:31 PM
Exit mobile version