घरठाणेशिवसेनेला मोठा धक्का, नरेश म्हस्के यांचा राजीनामा

शिवसेनेला मोठा धक्का, नरेश म्हस्के यांचा राजीनामा

Subscribe

ठाण्यातील शिवसेनेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आपल्या जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Ekanth shinde) यांच्या बंडामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदे यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार असल्याने शिवसेना खिळखिळी झाली आहे. याचदरम्यान, आता ठाण्यातील शिवसेनेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आपल्या जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. म्हस्के यांनी आपले हे राजीनामा पत्र शिवसेनाप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांना पाठवले आहे.

शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसैनिक आक्रमक झाले असून शनिवारी याच रागातून संतप्त शिवसैनिकांनी महाराष्ट्रात जागोजागी शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांचे पुतळे जाळत दगडफेक केली. याचवेळी ठाण्यात एकनाथ शिंदे यांना समर्थन देण्यासाठी श्रीकांत शिंदे यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर काही तासानंतरच नरेश म्हस्के यांनी राजीनामा दिला.

- Advertisement -

याबद्दल म्हस्के यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की गेले अडीच वर्षे आपल्या संघटनेची “राष्ट्रवादी” गळचेपी चाललंय त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी ट्विट तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे. मात्र आपण शिवसैनिक होतो, आहे आणि राहणारच असेही नमूद केले आहे. त्याचबरोबर भगवे आमचे रक्त तळपते, तप्त हिंदवी बाणा… जात गोत्र अन धर्म अमुचा शिवसेना, शिवसेना, शिवसेना…! असे म्हटले तसेच शेवटी जय महाराष्ट्र! म्हणून म्हस्के यांनी कोड्यात टाकले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाण्यातून पहिल्यांदा राजीनामा म्हस्के यांनी दिल्याने म्हस्के हे शिवसेनेचे की शिंदे यांचे महापौर होते असाच सवाल उपस्थित होत आहे.

 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -