कोकण मंडळाच्या घरासाठी १९ एप्रिलपर्यंत करता येणार अर्ज; म्हाडाने दिली मुदतवाढ

कोकण मंडळाच्या घरासाठी १९ एप्रिलपर्यंत करता येणार अर्ज; म्हाडाने दिली मुदतवाढ

CM Eknath Shinde यांच्यामुळे MHADA लॉटरीची तारीख निघेना, अर्जदारांमध्ये भीती

मुंबईः म्हाडाच्या कोकण मंडाळातील घरांसाठी निघणाऱ्या सोडतीकरिता १९ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. २१ एप्रिल २०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ऑनलाईन अनामत रक्कमही भरता येणार आहे.

ठाणे शहर-जिल्हा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील ४६४० घरांसाठी व १४ भूखंडांच्या विक्रीसाठी सोडत निघणार आहे. या सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत १९ एप्रिल पर्यंत वाढवण्यात आली आहे, अशी माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे यांनी दिली.

या सोडतीत पंतप्रधान आवास योजनेतील ९८४ घरे आहेत. त्यासाठीही अर्ज करता येणार आहे. या घरांसाठी अर्ज करताना पीएमएवाय नोंदणी प्रमाणपत्र बंधनकारक होते. नवीन नियमानुसार ही अट शिथिल करण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेसाठी असलेल्या निकषात अर्जदार बसत असेल तर तो अर्ज करु शकतो. सोडतीत घर लागल्यानंतर त्याचा ताबा घेण्याआधी पीएमएवाय नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे अनिर्वाय आहे, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी मोरे यांनी सांगितले.

अर्ज करण्याच्या नवीन प्रणालीत अर्जदाराला आयकर परतावा प्रमाणपत्र अपलोड करावे लागते. त्यानंतर पुढील प्रक्रिया मार्गदर्शक सुचनेनुसार पूर्ण करुन अर्ज भरावा. विवाहित महिलांनी काळजीपूर्वक अर्ज भरावा. माहेरचे नाव आणि सासरचे नाव यात गोंधळ न करता अधिकृत नावानेच अर्ज करावा, असे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे.

म्हाडा (MHADA)  प्राधिकारणाच्या कोकण आणि मुंबई मंडळाच्या प्रत्येकी 4 हजार अशी एकूण आठ हजार घरांसाठी लॉटरी निघणार आहे. मुंबई मंडळाच्या सुमारे 4 हजार घरांपैकी 2 हजार 600 घरं ही गोरेगाव पहाडी परिसरात आहेत. विशेष म्हणजे अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटांसाठी ही घरं बांधली जात आहेत. यातील अत्यल्प उत्पन्न गटातील घरांची अंदाजे किंमत 35 लाख रुपये आहे. गृहनिर्माण बाजारपेठेत याच घरांची किंमत अंदाजे 70 लाखांच्या आसपास असल्याचं सांगितलं जातं. कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज करण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे.

First Published on: April 5, 2023 8:04 PM
Exit mobile version