म्हाडा ताडदेवमध्ये महिलांसाठी ५०० खोल्यांचे वसतीगृह उभारणार

म्हाडा ताडदेवमध्ये महिलांसाठी ५०० खोल्यांचे वसतीगृह उभारणार

म्हाडा ताडदेवमध्ये महिलांसाठी ५०० खोल्यांचे वसतीगृह उभारणार

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कामासाठी आणि शिक्षणासाठी येणाऱ्या महिलांसाठी ताडदेवमध्ये हॉस्टेल उभारणार आहोत, अशी घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केली. येत्या दोन वर्षांमध्ये ते हॉस्टेल सेवेत दाखल होईल, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. राज्यभरातून महिला नोकरीसाठी, मुलाखतींसाठी मुंबईत येतात. त्यांना राहण्यासाठी हे हॉस्टेल बांधण्यात येणार आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ताडदेवमध्ये ५०० खोल्यांचं हॉस्टेल उभारणार आहोत, अशी माहिती पत्रकार परिषद घेत दिली. एक हजार महिलांची सोय त्या इमारतीमध्ये होईल, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे मागणी केली आहे. म्हाडा मुंबईतील ताडदेव येथे एक हजार महिलांसाठी पाचशे खोलीचं हॉस्टेल उभारणार असल्याची घोषणा केली. या हॉस्टेलमध्ये महिलांसाठी सर्व सुविधा असतील, असंही आव्हाड यांनी सांगितलं.

‘करेक्ट कार्यक्रम’ हा शब्दही चोरल्यासारखा वाटतो

जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. त्यांनी करेक्ट कार्यक्रम हा शब्द वापरला. हा शब्दही चोरल्यासारखा वाटतो. हा शब्द नेमका कुणाचा आहे हे सर्वांना माहीत आहे, असं टोला जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांना लगावला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर २४ तासांची निवडणूक प्रचार बंदी लावण्यात आली आहे. त्यावरही आव्हाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजप नेहमीच मतांचं ध्रुवीकरण करत आला आहे. हे सर्वांनाच माहीत आहे, असंही ते म्हणाले.

 

First Published on: April 13, 2021 4:06 PM
Exit mobile version