जळगावचे माजी महापौर अशोक सपकाळे यांच्या मुलाचा खून

जळगावचे माजी महापौर अशोक सपकाळे यांच्या मुलाचा खून

धक्कादायक! मृतदेहावर खुर्ची टाकून नवरा सांगू लागला बायकोच्या हत्येची कहाणी

जळगावात मध्यरात्री थरारक घटना घडली आहे. जळगावाचे माजी महापौर अशोक सपकाळे यांच्या मुलांची मध्यरात्री हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सध्या जळगावमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पूर्व वैमनस्यातून हत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी २ जणांची ताब्यात घेतले आहे.

जळगावातील शिवाजी नगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. जळगावाचे माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश अशोक सपकाळे मध्यरात्री १२ च्या सुमारास घरी परतत होता. त्यावेळेस शिवाजी नगरातील उस्मानिया पार्क जवळ त्याला दोन तरुणांनी अडवले. त्यानंतर त्यांच्यामध्ये वाद झाला आणि मग या वादाचे रुपांतर होऊन राकेशवर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले. जखमी झालेल्या राकेशला ओम क्रिटीकल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

काही महिन्यांपूर्वी राकेश वाद झाला होता. त्या वादामुळेच ही हत्याची झाल्याची प्राथमिक पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी पोलिसांनी २ जणांना ताब्यात घेतले आहे. गणेश आणि भुऱ्या अशा दोन तरुणांनी धारदार शस्त्रांनी राकेशवर वार केल्याची माहिती समोर येत आहे. पण या घटनेचे अद्याप कारण स्पष्ट उघडकीस झालं नसून लवकरच या हत्येचा उलगडा होईल असे पोलिसांनी म्हटले आहे.


हेही वाचा – डोंबिवलीत २ दिवसांचे बेवारस मूल सापडले!


 

First Published on: November 5, 2020 9:55 AM
Exit mobile version