बीएमसीवर कब्जा केल्यानंतर भाजप शिंदे गटाला कुठे सोडून देतील कळणारही नाही, इम्तियाज जलील यांचा हल्लाबोल

बीएमसीवर कब्जा केल्यानंतर भाजप शिंदे गटाला कुठे सोडून देतील कळणारही नाही, इम्तियाज जलील यांचा हल्लाबोल

मुंबई महापालिकेवर कब्जा करणे हाच भाजपचा हेतू आहे. कारण मुंबई महापालिका भाजपच्या हातात आल्यावर त्यांच्यासमोर दुसरे कोणतेही मोठं आव्हान राहणार नाही. तसेच मुंबई महापालिकेवर कब्जा केल्यानंतर भाजप शिंदे गटाला कुठे सोडून देतील हे कळणारही नाही, असा हल्लाबोल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

भाजपवर टीका करताना इम्तियाज जलील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावरही टीका केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे गरजेनुसार, सेक्युलर भूमिका स्वीकारतात. मात्र राजकारण करायचं असतं तेव्हा एमआयएम पक्षावर सर्रास भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातो. मात्र आता मुस्लिमांचा मोठा व्होट बँक काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून दूर गेलाय, असं जलील म्हणाले.

भाजपा फक्त शिवसेनेचा उपयोग करत आहे. मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवणे हा त्यांचा उद्देश आहे. मुंबईवर एकदा कब्जा झाला की, भाजपा कोणाला कुठे सोडून देईल माहिती नाही. भाजपला शिवसेनेत दोन गट पाडायचे होते. मुंबई महापालिका भाजपला मिळवायची आहे. त्यासाठी त्यांनी शिवसेनेत भांडणं लावली आणि त्यात भाजपला यश मिळालं आहे, असं इम्तियाज जलील म्हणाले.

राजकीय स्वार्थापोटी शहराचं नामांतर करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे मुस्लिम जनतेत प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरातील मुस्लिम लोकं औरंगजेबला फॉलो करत नाहीत, पण तो इतिहासाचा एक भाग आहे. त्यामुळे तो मिटवता येणार नाही, असं जलील म्हणाले.


हेही वाचा : मविआच्या स्थापनेनंतरही युतीची चर्चा सुरू होती, पण राणेंमुळे मोडता; केसरकरांचा गौप्यस्फोट


 

First Published on: August 5, 2022 3:49 PM
Exit mobile version