म्हणून गडकरींनी घेतला जोशी सरांचा आशीर्वाद

म्हणून गडकरींनी घेतला जोशी सरांचा आशीर्वाद

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

शिवसेनेचे ज्येष्ठनेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी आज, शुक्रवारी नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. एका व्याख्यानासाठी नागपुरात आले असता जोशी यांनी गडकरींच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी गडकरींनी जोशींना चरणस्पर्श करीत त्यांचा आशीर्वाद घेतला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मनोहर जोशी यांचे ऋणानुबंध फार जुने आहेत. राज्यात १९९६ साली पहिल्यांदा युतीचे सरकार अस्तित्वात आले त्यावेळी शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री बनलेल्या जोशी यांनी नितीन गडकरी यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाची धुरा सोपवली होती. गडकरी यांनी निष्ठेने आपली जबाबदारी सांभाळत सार्वजनिक बांधकाम खात्याला एक वेगळी उंची मिळवून दिली होती. तसेच युती शासनाच्या कार्यकाळातच गडकरी हे पुलकरी म्हणून नावरूपाला आले होते. गडकरी गुरुवारपासून नागपुरातच आयामुळे नागपूर भेटीवर असलेल्या जोशी यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली.

झाली प्रदीर्घ चर्चा

यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध आणि प्रदीर्घ चर्चा झाली. मध्यंतरीच्या काळातील मतभेदानंतर शिवसेना आणि भाजपची युती कायम राहणे ही सकारात्मक बाब असल्याचे मनोगत जोशी यांनी व्यक्त केले. सेना भाजप यांची युती झाली हे राज्याच्या हिताचे झाले आहे. आता दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित काम करायला हवं अशी अपेक्षा जोशी व गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली.

First Published on: March 15, 2019 6:08 PM
Exit mobile version