घरमहाराष्ट्रनितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले लोकसभा रिंगणात

नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले लोकसभा रिंगणात

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी आणि नाना पटोले एकाच मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. नाना पटोले यांना काँग्रेसकडून नागपूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर गडकरी भाजप कडून नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत नाना पटोले यांनी भाजपकडून निवडणूक लढवून भंडारा-गोंदिया मतदारसंघातून विजय मिळाला होता. मात्र, २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आगामी निवडणुकीत गडकरी विरुद्ध पटोले आमनेसामने येणार आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत महाराष्ट्रातील ५ उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. या यादीत नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून नाना पटोले यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत गडकरी आणि पटोले आमनेसामने येणार आहेत. गेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती. भंडारा-गोंदिया मतदारसंघातून पटोले विजयी झाले होते. मात्र, २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर नाराज होऊन पटोले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पटोले यांच्या राजीनाम्यानंतर भंडारा-गोंदिया येथे झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेसचे मधुकर कुकडे वियजी झाले होते.

हेही वाचा –नितीन गडकरी पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये?

- Advertisement -

नितीन गडकरींनी दिल्या शुभेच्छा

दरम्यान, या संदर्भात नितीन गडकरी यांना नागपूरात पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा नितीन गडकरी यांनी पटोले यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, ‘मी राजकारणात दुश्मनी ठेवली नाही, सर्वांशी माझे चांगले संबंध आहेत. नाना पटोलेंनी पक्ष सोडला असेल, तरी त्यांच्यावर आशिर्वाद कायम राहतील. तसेच निवडणुकीसाठी त्यांना शुभेच्छा.’ नितीन गडकरी हे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदारसंघातून निवडूण आले होते. या मतदारसंघात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मतदारसंघ महत्त्वाचा आहे. गेल्या निवडणुकीत गडकरी यांना ५ लाख ८७ हजार मते मिळाली होती. या निवडणुकीत काँग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार यांचा पराभव झाला होता. त्यांना ३ लाख ३ हजार मते मिळाले होते. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राजकारणाचे वेगळे गणित आखले आहे. नागपूर मतदारसंघासाठी काँग्रेसने नाना पटोले यांचे नाव निश्चित केले आहे.

हेही वाचा –नितीन गडकरी पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये?

- Advertisement -

‘काँग्रेस पक्षाला आपला उमेदवार ठरवण्याचा अधिकार आहे’

यासंदर्भात नितीन गडकरी म्हणाले की, ‘राजकारणात प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. मग तो कुणीही उमेदवार असेल. मी कुणावरही वैयक्तीक टीका-टीप्पणी करणार नाही. काँग्रेस पक्षाला आपला उमेदवार ठरवण्याचा अधिकार आहे. जो उमेदवार असेल, त्याने लढावं. मी जे पाच वर्षात काम केलं, त्याच्याच आधारावर लोकांसमोर जाऊन त्यांचा आशिर्वाद मागेन.’


हेही वाचा –‘प्रत्येकाने लघवी साठवल्यास देशाचे ४० हजार कोटी वाचतील’ – नितीन गडकरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -