…तर हे सर्व करणाऱ्यांना फासावर लटकवा, TET घोटाळ्यासंदर्भात अब्दुल सत्तारांची मागणी

…तर हे सर्व करणाऱ्यांना फासावर लटकवा, TET घोटाळ्यासंदर्भात अब्दुल सत्तारांची मागणी

एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा विश्वास - अब्दुल सत्तार

टीईटी घोटाळासंदर्भात शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचं समोर आलं आहे. परिक्षा परिषदेने रद्द केलेल्यांमध्ये ७ हजार ८७४ नावांमध्ये अब्दुल सत्तारांच्या मुलांचे नाव समोर आले आहे. यामुळे सत्तार यांच्याबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. त्यांच्या मुलांची नावे समोर आल्यानंतर माझ्या बदनामीसाठी हा सगळा कट विरोधकांनी रचला असून आमची चूक असेल तर आमच्या मुलांवर कारवाई करावी. नसेल तर हे सर्व करणाऱ्यांना फासावर लटकवा, अशी मागणी अब्दुल सत्तार यांनी केली आहे.

अब्दुल सत्तारांच्या पत्रकार परिषद घेत आपली बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा करण्यात आला आहे. मला व्हॉट्सअॅपवर अशा प्रकारचा मेसेज दिसल्यानंतर मी स्वत: त्याचं स्पष्टीकरण दिलं. कुणीतरी चुकीच्या माहितीच्या आधारे माझी बदनामी करत आहेत. परंतु त्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार, असं अब्दुल सत्तार म्हणाले.

माझ्या ज्या मुलाचे नाव यादीत आले आहे. त्याने कधीही टीईटी परीक्षा दिली नसून तो एलएलबी करत आहे. माझ्या दोन्ही मुलींनी टीईटी परीक्षा दिली आहे. आता चार वर्षांनी अपात्र झाल्याची यादी समोर आली आहे. याबद्दल शिक्षण आयुक्तांना तुम्ही विचार की, मुलाची नावे यात कशी आली. जर माझ्या मुलांनी गैर प्रकार केला असेल तर त्यांच्यावर कारवाई जरूर करावी, असं सत्तार म्हणाले.

दरम्यान, हे प्रकरण बाहेर आल्यावर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांना आता शिक्षण मंत्री केले जाईल, असा खोचक टोला लगावला. यावर आक्रमक होत अब्दुल सत्तार यांनी त्याचे स्पष्टीकरण दिले आहे.


हेही वाचा : मविप्र; संधी मिळेल त्या पदासाठी निवडणूक लढवणार : डॉ.तुषार


 

First Published on: August 8, 2022 2:10 PM
Exit mobile version