नानांनी सांगितल्यावर आवाज बारीक केलात, दम दिल्याच्या आरोपांवर फडणवीसांना जाधवांकडून प्रत्युत्तर

नानांनी सांगितल्यावर आवाज बारीक केलात, दम दिल्याच्या आरोपांवर फडणवीसांना जाधवांकडून प्रत्युत्तर

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज भाजपा आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर विधानसभा अध्यक्षांना धमकी देत असल्याचा गंभीर आरोप केला. त्यानंतर भास्कर जाधव यांनी अभिनेते नाना पाटेकर यांचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं.

देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांच्यावर दम दिल्याचा आरोप केला. माझा आवाज जरा मोठा आहे, असं मी मागच्यावेळी तुम्हाला सांगितलं होतं. तुमचाही आवाज मोठा होता. नाना पाटेकर यांनी सांगितल्यावर तुम्ही आवाज बारीक केला, अशी फडणवीसांची मुलाखत मी ऐकली, असं भास्कर जाधव म्हणाले.

काय म्हणाले होते भास्कर जाधव?

विधानसभा अध्यक्षांनी संपूर्ण देशात महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा काय सन्मान आहे, काय आदराची भावना आहे हे सांगितलं. तसेच ते कायम राखण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचं सांगितलं. आम्हाला हे मान्य आहे, मात्र माझी नम्र सूचना वजा विनंती आहे की, हे आमच्याकडून करून घेण्याची जबाबदारी सभागृहाच्या सर्वोच्च स्थानावरील अध्यक्षांची आहे, असं भास्कर जाधव म्हणाले होते.

दरम्यान, भास्कर जाधव यांच्या या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले. भास्कर जाधव अशाप्रकारे विधानसभा अध्यक्षांना धमकावू शकतात का? अध्यक्षांना धमकावण्याची नवी व्यवस्था सभागृहात सुरू झाली आहे का? अध्यक्ष महोदय हे आम्ही खपवून घेणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.


हेही वाचा : महाराष्ट्राचा बिहार झालाय, कसबा पेठेत दहशत निर्माण केली जातेय; नाना पटोलेंचा


 

First Published on: February 27, 2023 6:41 PM
Exit mobile version