“माझ्याकडे पिस्तुल होते, पण…”; सदा सरवणकरांकडून सारवासारव

“माझ्याकडे पिस्तुल होते, पण…”; सदा सरवणकरांकडून सारवासारव

सदा सरवणकर यांच्यावर आर्म अॅक्टसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वत:चं शस्त्र दुसऱ्याला दिल्याप्रकरणी सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई – गणपती विसर्जनावेळी शिवसेना आणि शिंदे गटात झालेला राडा (Prabhedevi Clashes) आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. शिंदे गटाच्या तक्रारीवरून शिवसेनेतील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. मात्र, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी याप्रकरणी हस्तक्षेप केल्यानंतर गुन्हे मागे घेण्यात आले, तर उलट सदा सरवणकरांसह अनेकांवरच पोलिसांनी गुन्हे दाखल केले. यावरून आमदार सदा सरवणकर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. माझ्याकडे परवाना असलेले पिस्तुल होते. पण माझ्यासोबत पोलीस अधिकारी असताना मी गोळीबार करण्याची मला गरज काय असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. ” (MLA Sada sarvankar reaction on firing in prabhadevi allegation)

हेही वाचा सदा सरवणकरांनी दोनदा गोळीबार केला, पोलिसांकडूनही दखल; अरविंद सावंतांचा दावा

“आमचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांनी सोशल मीडियावर केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्यावरून शिवसेनेचे शाखाप्रमुख महेश सावंतसह २०-३० कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी संतोष तेलवणे यांना मारहाण केली. हा प्रकार संयुक्तिक नव्हता. सोशल मीडियाचं उत्तर सोशल मीडियाने द्या, घरी जाऊन मारामाऱ्या करू नये. भविष्यात असे वाद होऊ नये म्हणून काळजी घ्यावी,” असं आवाहन आमदार सदा सरवणकर यांनी केलं आहे.

“तसंच, मला बदनाम करण्यासाठी रणनीती आखली गेली. मी कामाने मोठा झालेलो आमदार आहे. समोरच्या लोकांकडे सांगण्यासारखं काही नाही, त्यामुळे मला थांबवणं हा एकमेव उद्देश आहे. माझ्याकडे परवाना असलेलं पिस्तुल आहे. पण पोलीस फौज असताना मला गोळीबाराची गरज काय? सोशल मीडिया माझ्यासाठी अज्ञानाचा भाग आहे. मी तशा प्रकारचा गुन्हा केला नाही. पोलिसांवर दबाव आणून माझ्यावर गुन्हा दाखल झालाय,” असं सदा सरवणकर म्हणाले.

हेही वाचा – …मग सदा सरवणकर का गोळीबार करतील?, किरण पावसकरांचा सवाल

“रात्री सव्वाबारा वाजता मला समजलं की ४०-५० जण संतोष तेलवणेला मारत आहेत. म्हणून आम्ही प्रभादेवी चौकात गेलो. महेश सावंतसह आम्ही सगळे लहानाचे मोठे झालो. म्हणून महेश कुठे आहे असं आम्ही विचारलं असेल. आम्ही उद्रेक करण्यासाठी नाही तर प्रकरण शांत करण्यासाठी प्रयत्न करत होतो”, असंही स्पष्टीकरण सदा सरवणकर यांनी केलं.

“तसंच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना का सोडून दिलं, कोणती कलमं लावली, ते जामिनपात्र होतं का? याबाबत मला माहिती नाही. सणासुदीला अशा प्रकारची भांडणं करू नये. पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं तर मी जाईन. पोलिसांना आवश्यक ती माहिती देईन,” असंही ते म्हणाले.

हेही वाचा – राज्यपालांविरोधात उच्च न्यायालयात याचिका, १२ आमदारांच्या नियुक्तीचा वाद पुन्हा चिघळणार?

समस्त हिंदूजनाला वेदना

आम्ही सगळे एकाच कुटुंबातील, एकत्र राहणारी मुलं आहोत. अशाप्रकारचे वाद करणं उचित नाही. सणासुदीला आपआपसांत वाद करून, समस्त हिंदू समाजाला वेदना होतील, असं वागू नये, असं आवाहनही सदा सरवणकर यांनी केलं आहे.

First Published on: September 11, 2022 3:53 PM
Exit mobile version