आमदाराने केले वाहतूक नियमाचे उल्लंघन; महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केली कारवाई

आमदाराने केले वाहतूक नियमाचे उल्लंघन; महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केली कारवाई

गाडी चुकीच्या दिशेने वळवली म्हणून वाहतूक शाखेच्या एका डॅशिंग महिला कर्मचाऱ्यांनी थेट आमदारावरच धडक कारावई केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार हिंगोली शहरातील गांधी चौकात घडला आहे. मात्र, आमदारावरच कारवाई केल्यामुळे सध्या हा विषय हिंगोलीत चांगलाच चर्चेचा ठरला आहे.

नेमके काय घडले?

हिंगोली शहरातील गांधी चौकामध्ये असलेल्या चौधरी पेट्रोल पंपाकडे जाताना गाडी चुकीच्या दिशेने वळवण्यात आल्याने आमदारावर कारवाई करण्यात आली आहे. हिंगोली विधानसभा मतदार संघाचे भाजपचे विद्यमान आमदार तान्हाजी मुटकुळे यांना हिंगोली वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांने ऑनलाईन दोनशे रुपयांचा दंड ठोठावला आहे.

आमदार तान्हाजी मुटकुळे यांची कार एमएच -३८ व्ही -४४९९ अकोला रस्त्याने येऊन चौधरी पेट्रोल पंप कडे डिझेल भरण्यासाठी जात होती. दरम्यान, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षण उमाकांत चिंचोलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार; चालकाला वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी निश्चित स्थानावरुन गाडी वळवण्याचा इशारा दिला. मात्र, चालकाने पोलिसांचे काहीही ऐकले नाही आणि गाडी थेट पेट्रोल पंपावर घेऊन गेले.

दरम्यान, नियम मोडल्यानंतर वाहतूक शाखेच्या पथकाने वाहन अडवून त्यांना दोनशे रुपयांचा दंड ठोठावला.


हेही वाचा – महिला पोलिसाची चर्चा; आधी सांगितला पती, त्याची बायको येताच निघाला प्रियकर


 

First Published on: July 14, 2020 11:20 PM
Exit mobile version